Palghar BJP and Shivsena sarkarnama
मुंबई

Bjp Vs Shivsena News : महायुतीचा उमेदवार ठरेना; संभाव्य उमेदवाराचे खोटे पत्र व्हायरल !

A letter announcing the candidature of Prakash Nikam in the name of BJP has gone viral : भाजपच्या नावाने प्रकाश निकम यांना उमेदवारी जाहीर केल्याचे पत्र व्हायरल..

सरकारनामा ब्युरो

संदीप पंडित

Palghar Lok Sabha Constituency : पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरता ठरत नाही. या जागेवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या दोघांनी दावा केला असून, त्याचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपने जिल्हा परिषद सदस्य आणि एकनाथ शिंदे समर्थक प्रकाश निकम यांना उमेदवारी जाहीर केल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे. व्हायरल झालेल्या पत्राची दखल घेत भाजप प्रदेश कार्यालयाने मुंबईमध्ये याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

पालघर लोकसभेसाठी एकनाथ शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित इच्छुक आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे यांचादेखील पाठिंबा आहे. असे असले तरी गावित यांना भाजपचा अंतर्गत विरोध आहे. त्यामुळे या ठिकाणच्या उमेदवाराचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. भाजपकडून माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सावरा यांचे नाव पुढे येत होते. मात्र अचानकपणे भाजपच्या नावाने प्रकाश निकम यांना उमेदवारी जाहीर केल्याचे पत्र सोशल मीडियावर फिरू लागल्याने पालघर मतदारसंघात संभ्रम निर्माण झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकाराची माहिती वसई विधानसभा संघटक मनोज पाटील यांनी प्रदेशला कळविल्यानंतर भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजप कायदा विभागाचे अखिलेश चौबे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पालघरच्या (Palghar) निवडणुकीत आतापासूनच रंग भरू लागले आहेत. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष कोणाला उमेदवारी देणार याकडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पालघर लोकसभेसाठी शिंदे शिवसेनेचे प्रकाश निकम इच्छुक आहेत. मात्र, त्यांनी भाजपमध्ये (BJP) अद्यापही प्रवेश केलेला नाही. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढविण्याचा प्रश्नच येत नसल्याचे प्रकाश निकम यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, असे प्रकाश निकम यांनी सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT