Satara Lok Sabha 2024: निकालानंतर फासावर चढवा पण...; पवारांनी उमेदवारी दिलेल्या शिंदेंच्या विधानाने खळबळ

Shashikant Shinde On Udayanraje Bhosale: "काहीही झाले तरी माथाडी कामगार माझ्या मागे असून चांगले कोण आणि वाईट कोण? हे त्यांना चांगले माहिती आहे. ज्या उदयनराजेंचा मी प्रचार केला त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढत आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या वक्तव्याकडे लक्ष देणार नाही."
Shashikant Shinde, sharad Pawar
Shashikant Shinde, sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Satara Lok Sabha Election 2024: मुंबई बाजार समितीतील (Mumbai Market Committee) कथित घोटाळाप्रकरणी राजकीय द्वेषातून माझ्यावर आरोप केले जात आहेत. माझी राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी हा रडीचा डाव खेळला जात आहे. पण, मी परिणामांना घाबरत नाही. लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) होईपर्यंत विरोधकांनी थांबावे. त्यानंतर मला फासावर चढवायचे तर चढवा, अशा शब्दांत महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. (Satara Lok Sabha Constituency candidate MLA Shashikant Shinde)

मला मिळणारे पाठबळ पाहून हे सगळे आरोप एका मागून एक केले जात असून, यातील एक रुपयांचा जरी भ्रष्टाचार सिद्ध झाला तर राजकीय जीवनातून निवृत्ती घेईन, असंही शिंदे या वेळी म्हणाले. मुंबई बाजार समितीतील कथित घोटाळ्याप्रकरणी आमदार महेश शिंदे व नरेंद्र पाटील (MLA Mahesh Shinde and Narendra Patil) यांनी केलेल्या आरोपांवर आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. या वेळी माजी सभापती बाळासाहेब सोळसकर उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निकालानंतर मला फासावर चढवा

शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) म्हणाले, मी राजकीय जीवनात कार्यकर्ता ते नेते पदापर्यंत संघर्ष करत पोहोचलो आहे. कटकारस्थान करून करून माझी राजकीय कारकीर्द संपविण्याचा हा प्रयत्न आहे. किमान लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) होईपर्यंत माझ्यावर कारवाई होऊ नये, असे मला वाटते. निवडणुकीच्या निकालानंतर मला फसावर चढवा. पण, मला जनतेचे पाठबळ मिळते म्हणून माझ्यावर आरोप करून रडीचा डाव एक त्रिकुट रचत आहे.

परंतु, मी परिणामांना घाबरत नाही. लोकशाहीत निवडणूक होत असताना आरोप होत राहतात. पण आता यंत्रणांचा वापर होत असेल तर राजकीय विश्वासार्हता संपते. या घोटाळ्याशी माझा कसलाही संबंध नाही. मी एकट्याने हा निर्णय घेतलेला नाही. सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आहे. केवळ टीका करण्यासाठी त्यांचे हे सर्व चालले आहे. सध्या हीन पातळीवर राजकारण सुरू असून, द्वेष करणारी मंडळी एकत्र आली आहेत.

उदयनराजेंच्या वक्तव्याकडे लक्ष देणार नाही

माझी राजकीय कारकीर्द अडचणीत आणणे हेच काही लोकांचे काम आहे. पण, माझ्याकडे पुरावे आणि कॉल रेकॉर्ड आहेत. आम्ही ज्यांना खुर्चीवर बसविले त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. यामध्ये त्रिकुट जमले असून काही महिन्यांपासून त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत. काहीही झाले तरी माथाडी कामगार माझ्या मागे असून, चांगले कोण आणि वाईट कोण? हे त्यांना चांगले माहिती आहे. ज्या उदयनराजेंचा (Udayanraje Bhosale) मी प्रचार केला त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढत आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या वक्तव्याकडे लक्ष देणार नाही, असंही त्यांनी या वेळी सांगितलं.

Shashikant Shinde, sharad Pawar
Vishal Patil News : बापासारखं खासदार व्हावसं वाटतं, ही माझी चूक आहे का? भरसभेत विशाल पाटलांच्या डोळ्यात अश्रू

चार हजार कोटींच्या घोटाळ्यात मुळात त्या गाळ्यांचा ताबा बाजार समितीकडेच (Market Committee) असून, एफएसआयचे वाटप झालेले नाही. त्यामुळे एफएसआय वाटप केला नाही मग आमच्यावर आरोप का? असा प्रश्न त्यांनी केला. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी लोक पर्याय शोधत होते. मी अभ्यासू, निष्ठावंत आमदार आहे, लोकांची सहानुभूती मिळत असून कदाचित त्यांना माझ्या रूपाने हा पर्याय मिळाला आहे.

मुंबई बाजार समितीतील (Mumbai Market Committee) व्यापाऱ्यांपैकी एकाने सांगावे, मी भ्रष्टाचार केला आहे. तीन, चार लोकांची चौकडी आहे, त्यांच्यातीच ब्लॅकमेलर असून, तेच आरोप करत आहेत. लोकांपर्यंत सत्यता जावी म्हणून हे सांगत आहे. या लोकसभा निवडणुकीत मला न्याय मागू द्या. निवडणूक होईपर्यंत माझ्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करू नका, असं शिंदे या वेळी म्हणाले.

Shashikant Shinde, sharad Pawar
Sharad Pawar Solapur Tour : माेहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरायला येणाऱ्या शरद पवारांचा सोलापूर दौरा रद्द

चुकीच्या माणसांच्या पाठीशी उभे राहू नये...

उदयनराजेंनी दिलेल्या गांधी मैदानावर समोरासमोर या आव्हानावर शशिकांत शिंदे म्हणाले, मी गांधी मैदानावरून शक्तिप्रदर्शन करत आलेलो आहे. उदयनराजेंविषयी मला अधिक बोलायचे नाही. पण, त्यांनी चुकीच्या माणसांच्या पाठीशी उभे राहू नये. उदयनराजेंसोबत मुंबई बाजार समितीत जाण्यास मी तयार आहे. तेथील एका जरी व्यापाऱ्याने सांगितले तरी मी म्हणाल ते करण्यास तयार आहे, असंही शिंदे म्हणाले.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com