निखिल मेस्त्री
Municipal Election Voting : पालघरमधील वाडा नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक १२ आणि पालघर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ ब साठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या दोन प्रभागांची निवडणूक आज घेण्यात येत आहे. ७.३० ते ११.३० वाजेपर्यंतच्या पहिल्या चार तासांच्या सत्रात एकूण २५ टक्के मतदान झाले.
एकूण ३४५६ मतदारांपैकी पहिल्या दोन तासात ८६४ मतदारांनी मतदान केले. मतदान केलेल्यामध्ये ४५५ पुरुष तर ४०९ महिला मतदार आहेत. पालघर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ ब मध्ये एकूण २८५० मतदार आहेत. सकाळी ११.३० पर्यन्त त्यापैकी ७१३ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी २५.०२ टक्के इतकी होती.
तर वाडा नगरपंचायत मधील प्रभाग क्रमांक १२ मध्ये एकूण ६०६ मतदार आहेत. त्यापैकी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १५१ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी २४.९२ टक्के होती.
पालघर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ ब मध्ये निवडणूक चुरसीची आहे. या प्रभागात शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध ठाकरे गट अशी थेट लढत आहे. तर वाडामधील प्रभाग क्रमांक १२ मध्येही शिवसेना विरुद्ध भाजपा विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार एकमेकांसमोर आहेत.
गेल्या १८ दिवसात दोन्हीही प्रभागात रंगतदार प्रचार आणि मतदारांची मनमर्जी राखण्यासाठी प्रमुख लढतीतील उमेदवार आटोकाट प्रयत्न करत होते. काहीनी अनेक आकर्षक योजना आणि काहीनी मतदारांना चांगलेच लक्ष्मीदर्शन घडवले आहे. तरीही मतदार कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचे पारडे जड करतात, हे उद्याच्या मतमोजणीच्या दिवशीच समजणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.