Sanjog Waghere : भाजप प्रवेशासाठी जाताना नेता उद्धव ठाकरेंच्या आठवणीत भावूक..., त्यांनी लोकसभेला विश्वासाने उमेदवारी दिली पण...

Sanjog Waghere BJP Entry : संजोग वाघेरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मावळ लोकसभेची निवडणूक लढवली होती. वाघेरे यांना सहा लाख मतं मिळाली होती. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता. नुकतंच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.
Sanjog Waghere Join BJP
Sanjog Waghere during his BJP induction in Mumbai, marking a significant shift in Pimpri Chinchwad politics ahead of upcoming elections.Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News, 20 Dec : ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत संजोग वाघेरे यांनी ठाकरेंना मोठा धक्का दिला. त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत न जाता थेट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं.

अशातच आज संजोग वाघेरे मुंबईत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. यासाठी ते मुंबईला रवाना झाले. मात्र, मुंबईला जाण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरें यांच्याबद्दल मनात आजही आदर असल्याचं वक्तव्य केलं.

ते म्हणाले, 'आदरणीय उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला लोकसभेला उमेदवारी दिली त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर आजही माझ्या मनात असून त्याबाबतीत कोणतीही शंका नाही, असं ते म्हणाले.

Sanjog Waghere Join BJP
Satara Drug Case : 'साताऱ्यातील ड्रग्ज कारखान्यात बांगलादेशी? हिंदुत्वाची चांगली सेवा, शिंदेंचा 'हिंदू ड्रग्जभूषण' किताबाने सन्मान करायला हवा'; ठाकरेंचा हल्लाबोल

तर यावेळी त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश का केला याचं कारण देखील सांगितलं. ते म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि जी काही विकास कामे आहेत त्याला चालना देण्यासाठी भाजपसोबत जात आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी सोपे जातील.

Sanjog Waghere Join BJP
Nanded Mahayuti : तुमच्या किती जागा निवडून येणार? असं विचारत पदाधिकाऱ्यांचा अपमान; सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने शिंदेंच्या आमदाराचा भाजपला इशारा

माझ्यासोबत काही नगरसेवक आणि पदाधिकारी देखील आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असून पक्ष प्रवेश केल्यानतंर या सर्व नगरसेवकांची नाव तुम्हाला कळतील. तर यंदा महानगरपालिकेसाठी माझी पत्नी निवडणुकीच्या रिंगणात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, संजोग वाघेरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मावळ लोकसभेची निवडणूक लढवली होती. वाघेरे यांना सहा लाख मतं मिळाली होती. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता आगामी 2029ची लोकसभा भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास वाघेरे हे भाजपचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com