Ncp Leader Sharad Pawar Lateest News Sarkarnama
मुंबई

BMC निवडणुकीचं पवारांनी रणशिंग फुंकलं : युतीचा विचार न करता कामाला लागा...

BMC Election|Sharad Pawar : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत वॉर्ड अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक पार पडली.

सरकारनामा ब्यूरो

BMC Election : गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं आणि सत्तांतर झाल. शिवसेनेसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्यासोबत 40 आमदार घेत भाजपच्या (BJP) समर्थनाने नवं सरकार स्थापन केलं आहे. मात्र, हे सर्व झालं असतांनाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आता मुंबई महापालिकेच्या तयारीला लागले आहेत. (Ncp Leader Sharad Pawar Lateest Marathi News)

आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी आज (ता.13 जुलै) मुंबईत राष्ट्रवादीच्या विभागीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत पवार यांनी आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे (NCP) जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आतापासूनच तयारील लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. तसेच या पालिका निवडणुकीसाठी आपल्यासोबत कुणी येवो न येवो याचा विचार न करता तयारीला लागण्याचे स्पष्ट निर्देश वॉर्ड अध्यक्षांना दिले.

आज राष्ट्रवादीच्या वॉर्ड अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी पवारांनीच पालिका निवडणुकीची सर्व धुरा आपल्या हाती घेतल्याचं दिसत आहे. आतापासूनच दर २०दिवसांनी पवार हे मुंबईतील परिस्थितीचा वॉर्ड अध्यक्षांकडून आढावा घेणार असून कोणत्या वॉर्डात पक्षाची ताकद आहे, असे वॉर्ड निश्चित करुन त्याचाही आढावा ते घेणार आहेत. यामुळे मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचाराची धुरा स्वत: पवारच आपल्या हाती घेणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याने मुंबई पालिकेची सत्ता राखणं हे त्यांच्या पुढच मोठ आव्हान आहे. या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॅाग्रेस एकत्रितपणे सामोरे जातात का? हे आद्याप निश्चित झालेलं नाही. त्यामुळेच पवारांनी कुणी सोबत येतं का नाही येत याची वाट न पाहाता तयारीला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT