तू कसा आमदार होतो ते पाहते, फडणवीसांना जाऊन सांगेन! देशमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल

श्रीकांत देशमुख यांचा आक्षेपार्ह व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
Shrikant Deshmukh Latest News
Shrikant Deshmukh Latest News Sarkarnama

सोलापूर : भाजपचे सोलापूरचे (Solapur) माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. आता दोघांमधील एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये संबंधित महिलेने देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच तुला आता आमदार होऊ देणार नाही, अशी धमकीही दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाऊन सांगेन, असंही महिला म्हणत असल्याचे क्लिपमध्ये आहे. (BJP Leader Shrikant Deshmukh Latest News)

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशमुखांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जवळपास सतरा मिनिटांच्या या क्लिपमध्ये देशमुख आणि महिलेतील संभाषण आहे. ही महिला रडत-रडतच आपली व्यथा देशमुखांना सांगत असल्याचे ऐकू येते. तर मी मंगळसुत्र घातलंय. कुणाचं ऐकू नका. मी तुमच्यासोबत आहे, असं सांगत महिलेला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत.

Shrikant Deshmukh Latest News
ग्रीन टीमध्ये गुंगीचे औषध देऊन..! श्रीकांत देशमुखांचा धक्कादायक खुलासा

तू कधीच आमदार बनणार नाही

ऑडिओ क्लिपच्या सुरूवातीला तुम्हाला काय अडचण आहे ते मला सांगा, असं देशमुख महिलेला सांगताना ऐकू येत नाही. त्यानंतर ती महिला म्हणते, माझं आयुष्य बरबाद केलं. तुला माझं लक भेटणार नाही. तुलाही अर्धअधुरंच मिळणार, तु कधी आमदार बनणारच नाही. तु माझ्या लायकीचा नाही. मी आता माघारी वळू शकत नाही. मी आता सगळ्यांच्या समोर तुला उभं करणार आहे. मी प्रेमासाठी लग्न केलंय.

फडणवीसांना जाऊन सांगेन

मी तुझा असा तमाशा करणार आहे ना, तु देवेंद्र फडणवीसांना जाऊन नाही ना सांगितलं तर मी स्वत: जाऊन सांगेन. तुझं तिकीट अन् फिकीट गेलं खड्डयात. मी तुझ्यासाठी लकी नाही. तु जसं माझ्यासाठी काळ बनून आलाय तसं मी मरायच्या आधी तुझा काळ बनणार आहे, असा इशारा महिलेने देशमुखांना दिला.

Shrikant Deshmukh Latest News
'हनीट्रॅप'मधील भाजप नेत्याचा बेडरुममधील व्हिडिओ व्हायरल!

तर मला मारून टाका

मी कुठल्या गावच्या माणसाच्या नादाला लागले नाही. आता मला हक्क पाहिजे. मी शुन्यातच जमा आहे. मी दंगा करतेय म्हणून तुम्ही मला सांभाळताय का. मी चार पाच महिने झालं गप बसून गिळतेय. मला सगळं बाहेरून कळतंय. माझे बायकोशी संबंध नाहीत, असं तु बोललास. तीन वर्ष झाली, असंही महिलेनं म्हटलं आहे.

मला लग्न करायचं होतं म्हणून मी नमली. त्या दीपकसारख्या माणसाला मी विचारायला गेले नाही. अन् तु असा करतोस. तुझी बायको बोलतेय, मी त्रास देतेय म्हणून तु सांभाळतोय. तुमच्या घरातल्याच बाईमाणसानं सांगितलं. मी काय मुद्दामहून त्रास देतेय का. मी तुम्हा पाहिजे नसेल तर मला मारून टाका, असं हतबल होऊन ही महिला आपल्याला खूप त्रास होत असल्याचे सांगत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com