Narayan Rane, Uddhav Thackeray
Narayan Rane, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Narayan Rane on Uddhav Thackeray : कोरोना काळात लोक मरत होते; इकडे ठाकरे टेंडरमागे 15 टक्के घेत होते, राणेंचा थेट आरोप

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics : शिवसेनेच्या वाढीसाठी ठोस काम करता आले नाही, ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणतात. उद्धव ठाकरे यांना शिव्या देण्याशिवाय दुसरे काही करता येत नाही. ठाकरेंची भाषण म्हणजे आसुया, चीड, मत्सरातून होते. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला शोभा न देणारी भाषा त्यांनी वापरली. आपल्या काळात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले होते. कोरोना काळात खोके घेऊन औषधांची टेंडर मंजूर केली गेली, असा आरोप मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. राणेंनी ठाकरे सरकारमध्ये कायदा सुव्यव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होता. त्याकडे ठाकरेंनी डोळेझाक केली, असा आरोप केला.

राणे म्हणाले, "सुशांतसिंग यांना का मारले? दिशा सालियन यांची केस का ओपन झाली नाही? वाजे कोण ठाकरेंचे जावई आहेत का? नोकरीवर नसताना वाजेला पद दिले. अशा प्रकारे गुन्हेगारांना मदत करणारे ठाकरे मुख्यमंत्री होते. आपल्या काळात देशाबाहेरील शक्तीशी संबंध असलेल्यांशी संबंध ठेवले. मंत्रीमंडळातील तीन मंत्री तुरुंगात गेले. गृहमंत्र्यांनाही जेलमध्ये जावे लागले. आता ते कोणावर बोलतात?"

ठाकरे यांच्याकडे बाळासाहेबांसारखी (Balasaheb Thackeray) निष्ठा नाही. कडवटपणा, प्रामाणिकपणा नसल्याचेही राणेंनी यावेळी सांगितले. राणे म्हणाले, "बाळासाहेबांचे पुत्र सोडले तर तुमचे राज्याच्या, देशाच्या विकासात काय योगदान आहे? तुम्हाला कायद्याचे ज्ञान आहे का? विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न समजतात का? बाळासाहेबांचे नाव, शरद पवारांची मेहरबानी आणि हिंदुत्वाचा त्याग करून ते मुख्यमंत्री झाले होते. बाळासाहेब असते तर ते हिंदुत्वाचा त्याग करून मुख्यमंत्री होऊच शकले नसते. त्यांच्या नखाचीही तुम्हाला सर नाही."

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. कोरोना काळात त्यांनी अनेक खोके घेतल्याचा आरोप केला. राणे म्हणाले, "अडीच वर्षे तुम्ही जे काही खोके कामावले, त्यातील काही मदत शिवसैनिकांना केली नाही. कोरोना काळातील जे जे काही औषधांची टेंडर निघाले त्यातील १५ टक्के कमिशन अदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी घेतले. त्यानंतरच सही दिली. खरे तर औषधांवर एकही रुपया घ्यायला नको होता. ते खोटारडे, विक्षिप्त, दगेबाज, कार्यशून्य अशी व्यक्ती आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT