Uddhav Thackeray News: ''...तर त्याच 'फडतूस'सोबत पाच वर्षे सत्तेत कसे राहिलात?''; 'या' नेत्याचा ठाकरेंना खोचक सवाल

Thackeray Vs Shinde Group : ...मग तेच एकनाथ शिंदे गुंड का वाटू लागतात?
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Buldhana News: ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर परखड शब्दांत हल्लाबोल केला. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला. यानंतर भाजपसह शिंदे गटाच्या नेतेमंडळींवर सडकून टीका केली जात आहे. आता याचवरुन शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड(Sanjay Gaikwad)यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आमदार गायकवाड म्हणाले, ज्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तुम्ही त्यांना फडतूस गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर टीका केली आहे. मग फडतूससोबत मागचे पाच वर्षे कसे राहिले असा खोचक सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

Uddhav Thackeray
SSC Paper Leak Case : भाजप प्रदेशाध्यक्षांना अटक ; कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी रोखली ; video पाहा

...मग तेच शिंदे गुंड का वाटू लागतात?

गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हांला एकनाथ शिंदे चालले होते. त्यांनी अनेक वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली होती, मात्र आता लगेच त्यांचे तुम्हा वावडे वाटायला लागले. आणि मागील सहा महिन्यांत तुम्हाला ते लगेच गुंड का वाटू लागतात असा सवालही गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

बाळासाहेबांच्या विचारांसाठी फक्त बंडखोरी...

एकनाथ शिंदे यांच्यासोबत ज्या चाळीस आमदारांनी बंडखोरी केली आहे, ती फक्त बाळासाहेबांच्या विचारांसाठी केली आहे. बाळासाहेबांच्या विचारासाठी आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, तुम्ही आता काय करता तुम्ही तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटायचे धंदे चालू केले आहेत असा घणाघातही त्यांनी ठाकरे गटावर केला आहे.

Uddhav Thackeray
CJI Dhananjay Chandrachud: चक्क सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी माफी मागितली: काय आहे कारण?

संजय राऊतांनाही दिला 'हा' इशारा..

आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. गायकवाड म्हणाले, तुम्हीही तुमचा थोडा बंदोबस्त बाजूला ठेवा आणि मग बघा आमचे कार्यकर्ते काय करतात असा थेट इशाराच दिला. तसेच ज्यांना वाटते हे सरकार आणि त्यातील मंत्री चुकीचं काम करतात, त्यांनी न्यायालयात जावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.यावेळी मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या वायफळ बडबडीला आता लोकं कंटाळले आहेत असंही ते म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com