Jayant Patil Big Statement  Sarkarnama
मुंबई

NCP News : BJP मध्ये जाण्याचा विचार करणारे NCP मध्ये असू शकतात..; जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे ?

Jayant Patil News : ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मचरित्रात शरद पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Jayant Patil News : शरद पवार यांनी काल (शुक्रवारी) पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले. शरद पवार यांची ही पत्रकार परिषद अनेक मुद्द्यांनी लक्षवेधी ठरली.

पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या मागे बसलेली यंग ब्रिगेड सर्वांचे लक्ष वेधणारी होती. यामध्ये आमदार रोहित पवार यांची शरद पवार यांच्याकडे असलेली नजर चर्चेचा विषय बनली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतलेला निवृत्तीचा निर्णय अखेर मागे घेतला. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मचरित्रात शरद पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

वाय बी चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांवर शरद पवार यांनी विविध उत्तरे दिली. यावेळी पक्षातील काही नेते दुसऱ्या पक्षासोबत जाणार असल्याच्या चर्चा होत आहे, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. यावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “कुणाला जायचंच असेल तर मग तो कोणत्याही राजकीय पक्ष असो, कुणाला थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर संघटनेत आणखी बळ कसं वाढू शकतं, याकडे अधिक लक्ष दिलं गेलं पाहिजे. हेच मला समजतं. पण अशी गोष्ट आमच्या संघटनेत नाही”, पवार यांच्या या विधानानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शरद पवारांनी या पुस्तकात अनेकांना भाजपमध्ये जायचं आहे, असे लिहिलं आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक विधान केले.

'भाजपसोबत जाण्याचा विचार करणारे काही लोक पक्षात असू शकतात. परंतु, त्यांची संख्या मर्यादित असेल. मात्र, माझ्यासमोर असं मत कुणीही व्यक्त केलेलं नाही,' असं जयंत पाटील म्हणाले.

शरद पवार यांनी राजीनाम्याबाबत निर्णय जाहीर करण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपामध्ये जाण्याचे वृत्त समोर आले होते. या नाट्याला पूर्णविराम देण्यासाठी शरद पवारांनी ही खेळी केल्याची चर्चा आहे. त्यानंतर जयंत पाटील यांच्या विधानाने पुन्हा एकदा या चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT