Sharad pawar, Uddhav Thakre & Balasaheb Thorat Latest News
Sharad pawar, Uddhav Thakre & Balasaheb Thorat Latest News Sarkarnama
मुंबई

हिंदुत्व, सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेसशी कायमच मतभेद ; राऊतांच्या वक्तव्याने 'मविआ'च्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह?

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला आहे.भाजपसह (bjp) शिवसेनेच्या नेत्यांनी देखील गांधी यांच्या विधानावर सडकून टीका करताना तीव्र संताप निर्माण केला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाष्य करताना हिंदुत्त्व आणि सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेसशी आमचे कायमच मतभेद असतील, असं मोठं विधान केलं आहे.यामुळे ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीतील भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. (Sharad pawar, Uddhav Thakre & Balasaheb Thorat Latest News)

राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर महाविकास आघडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटावर देखील भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता.आता याच मुद्द्यावरून राऊतांनी देखील एका खासगी वृत्तवाहीनीशी बोलताना मोठं विधान केलं. त्यामुळे अनेकाच्या भुवया उंचावल्या आहेत.

राऊत (Sanjay Raut) म्हणाले, युती कायम ठेवण्यासाठी आम्हाला काँग्रेससोबत राहणं गरजेचं आहे.आम्ही नेहमीच सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याशी चर्चा करत असतो.प्रत्येक मुद्द्यावर आमचं एकमत नसेल.मात्र हिंदुत्त्व किंवा सावरकरांच्या मुद्द्यावर आम्ही तडजोड करणार नाही. राहुल गांधींबाबत आम्ही काही चर्चा करणार नाही. पण, त्यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. युतीमध्ये तडजोड करावी लागत असते, युती ही नेहमीच तडजोडीतून केलेली असते, असेही राऊतांनी स्पष्ट केले.

पुढे ते म्हणाले,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मुद्द्यावर कदापि तडजोड करणार नाही.तसेच सावरकर १० वर्ष अंदमान जेलमध्ये होते.ज्यांनी कारावास भोगला त्यांनाच तो अनुभव काय असतो हे समजू शकतं.पण सावरकर,नेहरु किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस अशा कुणाच्याही इतिहासाची मोडतोड करणं योग्य नसल्याचेही राऊतांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT