Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari  Sarkarnama
मुंबई

Bhagat Singh Koshyari : शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; कोश्यारींचे राज्यपाल पद जाणार?

सरकारनामा ब्यूरो

Bhagat Singh Koshyari News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यपालांनी जनतेतील एकोपा आणि शांतता बिघडवल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलाय. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असून राज्यपालांबाबत काय निर्णय होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. आता तर थेट राज्यपालांना पदावरुन हटवण्यासाठी कायदेशीर हालचाली सुरु झाल्याचं समोर येत आहे. दीपक जगदेव यांच्यावतीने अॅड. नितीन सातपुते यांनी मुंबई हायकोर्टात (High Court of Bombay) याचिका दाखल केली आहे.

या याचिकेमध्ये राज्यपालांवर राज्यातील शांतता आणि एकोपा बिघडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच राज्यपाल कोश्यारींनी वारंवार महापुरुषांचा अपमान केला असून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचं याचिकेत म्हटलं आहे. दरम्यान, या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असून याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या सर्व घडामोडीनंतर राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य भोवण्याची चिन्हं आहेत.

राज्यपालांचा २४ आणि २५ नोव्हेंबरला दिल्ली दौरा? :

राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभरातून टीका होत आहे. यावर भाजपने (BJP) सारवासारव केली आहे. मात्र २४ आणि २५ नोव्हेंबरला राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोश्यारींच्या या दिल्ली दौऱ्यामध्ये नेमके काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT