Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Saurabh Pimpalkar with BJP Leaders: पवारांना धमकी देणाऱ्या पिंपळकर'चे भाजप नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल...

BJP Politics सौरभ पिंपळकर हा अमरावती भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Threat news: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांना धमकी देणारा हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीने ट्विटरवरुन पवारांना धमकी दिली आहे. तेव्हापासून हा सौरभ पिंपळकरचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील गोपालनगर भागात राहणारा सौरभ हा अमरावती भाजप युवा मोर्चाचा तो पदाधिकारी आहे. अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सौरभ पिंपळकरच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Sharad Pawar Threat News) पण अद्यापही या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. अशी माहिती रेड्डी यांनी दिली आहे. अशातच सौरभ पिंपळकरचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतचे काही फोटो आता सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागले आहेत.

या प्रकारानंतर, मुंबईचे पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली. फडणवीस यांनी या धमकी प्रकरणाची योग्य ची तपासणी करून वेगाने कारवाई करा, असा आदेश फडणवीस यांनी दिला आहे.

मुंबई पोलीस आयुक्त फणसळकरांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीत शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी आल्याच्या प्रकरणावर दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर कारवाई करण्याचे आदेस फडणवीसांनी दिले आहेत.

फडणवीस म्हणाले, राज्याच्या राजकारणाला मोठी परंररा आहे. आमचे राजकीय मुद्द्यांवर मतभेद जरूर आहेत, मात्र वैयक्तिक पातळीवर आमचे कुणाशीही कोणतेही मतभेद नाहीत. समाज माध्यमांवर व्यक्त होत असताना, काही लिहीत असताना, कोणालाही धमकी देणे आणि सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून जाणे, ही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. दरम्यान, या प्रकरणात पोलीस यंत्रेणेकडून नक्कीच योग्य ती कायदेशीर कार्यवाही होईल,असे फडणवीस म्हणाले.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT