Ram Shinde News : पराभवाचा वचपा राम शिंदे घेतील का ?; कर्जत-जामखेडची जबाबदारी..

Maharashtra Politics: शिंदे यांचा राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी पराभव करत त्यांना मोठा धक्का दिला होता.
Rohit Pawar, Ram Shinde
Rohit Pawar, Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: सर्वच राजकीय पक्षांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी करण्यास सुरूवात केली आहे. भाजपने तर लोकसभांकडे विशेष पद्धतीने लक्ष देण्यासाठी निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात लक्षवेधी राहणाऱ्या कर्जत-जामखेडची जबाबदारी विधानपरिषद आमदार राम शिंदे यांच्याकडेच राहणार आहे. शिंदे यासाठी कामाला लागले आहेत. 2019 ला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असताना 2019 ला शिंदे यांचा राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी पराभव करत त्यांना मोठा राजकीय धक्का दिला होता.

Rohit Pawar, Ram Shinde
Death Threat To Sanjay Raut: पवारांपाठोपाठ राऊतांनाही जीवे मारण्याची धमकी, सकाळचा भोंगा बंद..

गेल्या जवळपास चार वर्षात शिंदे-पवार यांच्यात विविध कारणाने सातत्याने खडाखडी झाली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी राम शिंदे यांनी नगर दक्षिणेच्या लोकसभेसाठी जाहीरपणे उमेदवारीची मागणी माध्यमातून केली होती तसेच पक्षकडे कळवली होती.

त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या मागणी बाबत काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. मात्र 2019 च्या पराभवाचा वचपा घेण्यासाठी शिंदे प्रयत्नशील असतील असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Rohit Pawar, Ram Shinde
Lok Sabha Elections 2024 : विधानसभेच्या मध्यावधीबरोबरच लोकसभेची निवडणूक ?; परिस्थिती पाहून पंतप्रधान मोदींकडून...

कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे, अकोले मतदारसंघात वैभव पिचड, कोपरगावमध्ये स्नेहलता कोल्हे तर राहुरी मतदारसंघात शिवाजी कर्डीले यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून पराभव झाला होता.

या चारही ठिकाणी 2024 साठीच्या विधानसभेला हीच मंडळी संभाव्य उमेदवार असल्याचे मानण्यात येते. पक्षाने त्यांच्यावरच निवडणूक प्रचार प्रामुख्याने पदाची जबाबदारी दिली आहे, एकूणच 'माझ्या मतदारसंघ माझी जबाबदारी' या अनुषंगाने त्यांची जबाबदारी वाढली असल्याचे बोलले जाते.

Rohit Pawar, Ram Shinde
BJP leaders Letter to Rahul Gandhi : राहुल गांधींच्या "मोहब्बत की दुकान' ला भाजपचं सडेतोड उत्तर ;'नफरत का मेगामॉल'..

अहमदनगर जिल्ह्यातील मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुख खालील प्रमाणे

216 - अकोले मतदारसंघ : वैभव पिचड

217 - संगमनेर मतदारसंघ - सतिश कानवडे

218 - शिर्डी मतदारसंघ - ॲड रघुनाथ बोठे

219- कोपरगाव मतदारसंघ - स्नेहलता कोल्हे

220 - श्रीरामपूर मतदारसंघ - नितीन दिनकर

221 - नेवासा मतदारसंघ- बाळासाहेब मुरकुटे

222 - शेवगाव मतदारसंघ- नारायण भगवान पालवे

223 - राहुरी मतदारसंघ - शिवाजीराव कर्डिले

224 - पारनेर मतदारसंघ - विश्वनाथ कोरडे

225 - अहमदनगर - भैय्या गंधे

226 - श्रीगोंदा - बाळासाहेब महाडिक

227 - कर्जत-जामखेड मतदारसंघ - आमदार प्रा.राम शिंदे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com