NCP  Sarkarnama
मुंबई

NCP : भाजपने पाण्यातही केला 30 कोटींचा भ्रष्टाचार ; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

NCP : पालिका आयुक्त शेखरसिंह यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

सरकारनामा ब्युरो

Pimpri Chinchwad Municipal Corporation : "अजितदादा आले की सगळे जमतात,पाठ फिरताच पांगतात," या हेडिंगखाली पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांची भाजपविरुद्ध झुंज सुरू असल्याचे पण, त्याला शहरातील ज्येष्ठ नेत्यांसह सर्वांची साथ मिळत नसल्याचे वृत्त नुकतेच (ता.२८) `सरकारनामा`ने दिले होते. त्याचा लगेचच परिणाम झाला. पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात काल (ता.३०) राष्ट्रवादी तथा गव्हाणेंच्या नेतृत्वात झालेल्या पाणी आंदोलनात बऱ्यापैकी पक्ष एकत्र दिसला. (pcmc news update)

भामा-आसखेड (ता.खेड)धरणातून पाणी उचलण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका बांधत असलेल्या जॅकवेलच्या कामात भाजप नेत्यांनी प्रशासनाच्या संगनमताने तीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादीने या आंदोलनाच्या वेळी केला. त्यांचा रोख शहराचे कारभारी आणि भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगेंच्या दिशेने होता.

भोसरी मतदारसंघात जॅकवेलच्या या कामात हा भ्रष्टाचार झाल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. त्याविरोधात त्यांनी काल संध्याकाळी पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांना पालिका मुख्यालयातील त्यांच्या केबिनमध्ये घेराव घातला.यावेळी त्यांनी दिलेल्या `चाटून खा, फुसून खा, `भाजपने सोडला सदाचार, पाण्यातही केला भ्रष्टाचार`, जनता के सन्मान में, राष्ट्रवादी मैदान मे`, प्रशासन हटवा- पिंपरी-चिंचवड वाचवा`या घोषणांनी महापालिकेचा हा मजला दणाणून गेला होता.नंतर त्यांनी पालिका आयुक्त शेखरसिंह यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

जॅकवेलच्या कामाची निविदा रद्द करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन केली.या निविदेत फक्त एकच ठेकेदार कसा पात्र ठरला,छत्तीसगड राज्यात ब्लॅकलिस्टेड असलेल्या या ठेकेदारालाच हे काम ते ही २२ टक्के निविदा रकमेच्या जास्त का देण्यात आले,अशी प्रश्नांची सरबत्ती यावेळी सवणेनंतर आयुक्तांवरही आंदोलकांच्या शिष्टमंडळाने केली.

जॅकवेलचे काम 121 कोटी रुपयांचे असताना ते 151 कोटी रुपयांना देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला असून त्यातून राज्यातील सत्तेच्या जोरावर भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून महापालिका प्रशासनाशी संगनमत करून पालिकेची लूट सुरू असल्याचाल आरोप गव्हाणेंनी यावेळी केला. या कामाची निविदा रद्द केली नाही,तर पालिकेला घेराव घालण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले, प्रशांत शितोळे,माजी नगरसेवक विक्रांत लांडे, प्रविण भालेकर, मयूर कलाटे,शाम लांडे, विनोद नढे,माया बारणे, वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत, प्रवक्ते विनायक रणसुभे, फजल शेख आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सामील झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT