Mumbai News: महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान मोदींची आज मुंबईत शिवाजी पार्कवर सभा पार पडली. महाष्ट्रातील मोदींची ही यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठीची शेवटची सभा होती.यावेळी मोदींनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला. तसेच राहुल गांधींच्या तोंडून एकदा तरी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणून दाखवा, असं चॅलेंजही यावेळी मोदींनी उद्धव ठाकरेंना दिलं.
पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंवर(Uddhav Thackeray) निशाणा साधताना म्हणाले, 'आज एक गोष्ट महत्वाची आहे. एक हे तो सेफ है. मुंबई बाळसाहेबांच्या सिद्धांताचे शहर आहे. पण आघाडीत एक असा पक्ष आहे. बाळसाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट दिला आहे. एकदा तरी राहुल गांधीच्या मुखातून बोलवून दाखवा की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. हे असं झाल ना तर तुम्हांला खुप चांगली झोप येईल. तुम्हांला हॉस्पिटल मध्ये जायची गरज लागणार नाही. सावरकरांना शिव्या देणाऱ्या लोकांना पण हे मिठी मारतात.'
याशिवाय, 'या महाराष्ट्रात एका ठिकाणी महायुतीची विचारधारा आहे. जी सर्व संत व महाराष्ट्राच्या गौरवाला पुढे नेते व एका ठिकाणी एक आघाडी आहे, जी महाराष्ट्राच्या गौरवाचा अपमान करते. राम मंदिराला विरोध करते. सावरकरांचा अपमान करते. 370 परत यावा म्हणून प्रस्ताव पारित करतात. कश्मिरमध्ये सविधान लागू करण्यासाठी विरोध करतात.' असंही मोदींनी म्हटलं
तसेच 'राजकारणात एकमेकांवर वार करणं समजू शकतो. पण देश हा पक्षापेक्षा मोठा आहे. भाजपचा(BJP) महायुतीचा हा मंत्र आहे व निती आहे. पण मविआला देशापेक्षा पक्ष मोठा आहे. देश पुढे गेला तर 'मविआ'ला बघवत नाही. हेच लोक आहेत ज्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला नाही. तुम्हाला मविआच्या राजकारणापासून सावधान रहायचं आहे.' असं मोदींनी सांगितलं.
तर, 'मुंबई ही स्वप्ननगरी आहे. तर महायुती हे स्वप्न पूर्ण करणारी युती आहे. लोकांना स्वप्न बघण्याची संधी नाही मिळाली. पण आज प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होत आहे. मुंबईत अनेक स्टार्ट अप आले. गरिबांना घर मिळत आहे. कमी व्याजदरात लोन मिळत आहे. आपल्या भविष्याला घेऊन निश्चिंत झाले आहेत. आज 70 लाख लोकांना आपला व्यापार वाढवायला मदत मिळाली आहे. सेवा भावनाची कामं फक्त भाजप व महायुतीचं करु शकते. मी नम्रतेने तुम्हांला सांगू इच्छितो. मी जबाबदारीने सांगतो. तुमचे स्वप्न हेच महायुतीचे संकल्प आहेत.' असं मोदी म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.