Narendra Modi : पीएम मोदींनी घातली मुंबईकरांना भावनिक साद; म्हणाले, 'तुमची स्वप्ने हाच आमचा संकल्प'

Political News : काँग्रेसची वागणूक ही भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारी आहे. राज्यातील विकासकामात अडथळा आणला जात आहे. या मंडळीनी अटल सेतूला विरोध केला आहे. त्यांनीच मेट्रोला विरोध केला असल्याचा आरोप पीएम मोदी यांनी केला.
narendra modi (1).jpg
narendra modi (1).jpgsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील महायुती ही स्वप्न साकार करणारी आघाडी आहे. विधानसभा निवडणुकीसाठी माझी ही शेवटची सभा आहे. तुमचे स्वप्ने हाच आमचा संकल्प आहे. माझं आयुष्य तुमच्या स्वप्नसाठी लढत असल्याचे सांगत येत्या काळात तुमची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी द्या, असे म्हणत पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना भावनिक साद घातली.

मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. काँग्रेसची वागणूक ही भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारी आहे. राज्यातील विकासकामात अडथळा आणला जात आहे. या मंडळीनी अटलसेतूला विरोध केला आहे. त्यांनीच मेट्रोला विरोध केला आहे. या मंडळींनी युपीआय व टेक्नाॅलाॅजीची टिंगल उडवली. मुंबईत सर्व जातीचे लोक येतात. सर्व भाषाचे लोक येतात एकत्र राहतात, पण मविआ जातीच्या नावावर भांडण लावत आहेत, असा आरोप त्यांनी केला

narendra modi (1).jpg
Goa CM Pramod Sawant : 'उध्दव ठाकरे यांच्या स्वार्थामुळे...' ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साधला निशाणा!

महाविकास आघाडीमुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी प्रत्येक गोष्टीला विरोध केला आहे. महाविकास आघडीने राम मंदिरालादेखील विरोध केला. त्यासोबतच मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यास महाविकास आघाडी सरकारने विरोध केला असल्याचे त्यांनी सांगितले.

narendra modi (1).jpg
Nitin Gadkari : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा परतणार का ? भाजपच्या नितीन गडकरींचं मोठं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com