PM Modi, Dino Morea Sarkarnama
मुंबई

Thackeray vs BJP : PM मोदी-डिनो मोरियाच्या फोटोवरून वाद; 'बार्किंग ब्रिगेड' म्हणत अंधारेंची नितेश राणेंवर बोचरी टीका

PM Modi Dino Morea Photo Sushma Andhare Slams Nitesh Rane And BJP : पंतप्रधान मोदी आणि अभिनेता डिनो मोरिया यांचा फोटो शेअर करत ठाकरे गटाचा भाजपवर हल्लाबोल...

Sachin Fulpagare

Maharashtra Politics Latest News : भाजप आमदार नितेश राणे हे अभिनेता डिनो मोरिया याचे नाव घेत आदित्य ठाकरेंवर आरोप करत असतात. तसेच डिनो मोरिया याला बीएमसीचा 'सचिन वाझे' असेही म्हटले होते. आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक फोटो ट्विट करत फक्त नितेश राणे यांचीच नाही तर, महाराष्ट्र भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई महापालिकेशी संबंधित कुठलेही काम चुटकीत करू शकतो, असे डिनो मोरिया सांगतो, असा आरोप नितेश राणेंनी केला होता. एवढेच नव्हे तर डिनो मोरियावर ईडीनेही कारवाई केली होती. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत नाताळ सण साजरा करतानाचा फोटो डिनो मोरियाने सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

आपल्याला नाताळ सणाच्या सोहळ्यात निमंत्रण दिल्याबद्दल त्याने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. 25 डिसेंबरला नाताळनिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्लीत एक खास सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याचे अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते. डिनो मोरियाही या सोहळ्याला उपस्थित होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिनेता डिनो मोरिया यांचा हाच फोटो सोशल मीडियावरून शेअर केला आहे. ट्विटरवरून हा फोटो शेअर करत सुषमा अंधारे यांनी नितेश राणेंसह भाजपवर हल्लाबोल केला आहे. टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना सुषमा अंधारे यांनी 'बार्किंग ब्रिगेड' अशी उपमा देत निशाणा साधला आहे.

काय म्हणाल्या अंधारे?

मला हे अजिबात आवडलेलं नाही. दर वेळी आमच्या नितू बाळाला असं तोंडघशी पाडायचं याचा अर्थ काय? याच डिनो मोरियावरून नितू आणि भाजपच्या सर्व बार्किंग ब्रेगडने किती उर बडवून घेतला होता, असे ट्विट करत अंधारे यांनी बोचरी टीका केली आहे. या ट्विटसोबतच अंधारे यांनी एक हॅशटॅग दिला आहे. 'नकली हिंदू' असा हॅशटॅग देऊन भाजपला टोलाही लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT