Mumbai : अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळाले नाही. त्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. त्याचवेळी, संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला करत राम मंदिराच्या आंदोलनात यांचा सहभाग काय? असा सवाल उपस्थित केला. बाबरी पाडण्यात शिवसैनिक आघाडीवर होते, याची आठवण करून देत लालकृष्ण अडवाणी यांनी बाबरी पाडल्याचे नाकारले. बाळासाहेब ठाकरेंनी ती जबाबदारी घेतली, असे देखील संजय राऊत म्हणाले.
सत्तेत असणाऱ्यांच्या इतिहास हा 2014 नंतरचा आहे. आमचा इतिहास हा प्राचीन आहे. सत्तेत असणाऱ्यांनी ब्रिटिशांना मदत केली. यांचा आणि इतिहासाचा संबंध काय, असा हल्ला देखील संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर केला. हे भगतसिंह, महात्मा गांधी, पंडित नेहरू घडवू शकले नाहीत. हे काहीच घडवू शकले नाहीत. स्वातंत्र्य आंदोलनात हे कुठे होते, महाराष्ट्राच्या लढ्यात कुठे होते, 1992 च्या दंगलीत मुंबई पेटली असताना हे कुठे होते, असा सवाल देखील राऊत यांनी केला.
उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार का, असे पत्रकारांनी विचारले असता राम मंदिर कोणाच्या बापाचे आहे का, असे उत्तर राऊत यांनी दिले. ईव्हीएममुळे तुम्ही आहात, नरेंद्र मोदींना रामाचा अवतार म्हटले जात आहे, हे हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य आहे का, विश्व हिंदू परिषदेला मान्य आहे का, या देशात रामापेक्षा कोणी मोठं झालंय का?, असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
स्वातंत्र्यलढ्यात तु्म्ही कुठल्या बिळात लपला होता हे सगळं आमच्याकडे आहे. क्रांतिकारकांची माहिती देण्यात हे लोक पुढे होते. ते या देशाचे राज्यकर्ते झाले आहेत, हे दुर्देव आहे, असे राऊत म्हणाले. तसेच महाविकास आघाडीत जागा वाटपावरून एकमत आहे, अशी माहिती देखील राऊत यांनी दिली.
Edited by Roshan More
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.