PM Narendra Modi Sarkarnama
मुंबई

PM Modi : मोदींनी RBI ला दिला 100 दिवसांचा अवधी; शपथेच्या दुसऱ्या दिवसानंतर 'धमा धम' कामाचे संकेत

Sachin Deshpande

PM Modi Speech in Mumbai 90 years of RBI : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाची केंद्रीय बँक अर्थात आरबीआयच्या 90 व्या वर्धापनदिनी पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत दिले आहेत. आरबीआयने शंभर दिवसांत त्यांचा रोड मॅप फिक्स करावा, असे मोदींनी सांगितले. पुढील 100 दिवस पंतप्रधान निवडणुकीत व्यस्त असल्याने त्या 100 दिवसांचा वापर आरबीआयने करावा. त्यानंतर पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुमच्याकडे 'धमा धम' काम येतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

आरबीआयच्या 90 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास हे आउटबाॅक्स विचार करतात, असे मोदी यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवित जोरदार समर्थन दिले. या वेळी 90 रुपयांचा चांदीचा शिक्का काढण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योग जगतातील दिग्गज नेते आणि राजकारणी उपस्थित होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्यपाल रमेश बैस, मुकेश अंबानी, रामदास आठवले आदींची उपस्थिती होती.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारच्या धोरणामुळे गेल्या 10 वर्षांत नवीन क्षेत्रे निर्माण झाली आहेत. देशातील तरुणांना नवीन संधी मिळत आहेत. आज सरकार हरित ऊर्जा, सौर ऊर्जा आणि हरित हायड्रोजन यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांची व्याप्ती वाढवत आहे. डिजिटल तंत्रज्ञान मोठी ताकद दिली जात आहे.

रिझर्व्ह बँकेने भविष्यात तरुणांना कर्ज उपलब्धता कशी होणार, इनोव्हेशन सेक्टरवर लक्ष केंद्रित करावे. असे संकेत मोदींनी दिले. इनोव्हेशन सेक्टरबरोबर स्पेस तंत्रज्ञानावरदेखील ऊर्जा देण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. देशात पर्यटन क्षेत्रही वाढत आहे आणि संपूर्ण जगाला भारतात यायचे आहे, भारत बघायचा आहे, भारत समजून घ्यायचा आहे. अयोध्या धार्मिक पर्यटनाची जगातील राजधानी होण्याचे भाकीत मोदींनी व्यक्त केले. पर्यटन या क्षेत्राला आर्थिक पाठबळ देण्यासाठी आपली तयारी सुनिश्चित करावी लागणार असल्याचे मोदी म्हणाले.

जगात आपला रुपया स्वीकारला गेला पाहिजे, असे ही मोदी म्हणाले. अनेक देशांचे खासगी क्षेत्रातील कर्ज त्यांच्या जीडीपीच्या 2 पट झाले आहे. अनेक देशांच्या या धोरणामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. याचाही अभ्यास रिझर्व्ह बँकेने करायला हवा. जगात ए आय आणि ब्लॉकचेनसारख्या नवीन तंत्रज्ञानाने बँकिंग प्रणाली बदलली आहे. आपण हा बदल स्वीकारण्याची गरज आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या दहा वर्षांत भारताच्या बँकिंग प्रणाली आणि अर्थव्यवस्थेच्या परिवर्तनामध्ये कौतुकास पात्र भूमिका बजावली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी मुंबईत RBI च्या 90 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

वाढत्या डिजिटल बँकिंग प्रणालीमध्ये सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यावर अधिक काम करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली. देशाच्या बँकिंग क्षेत्राच्या रचनेत कोणते बदल आवश्यक आहेत, याचा विचार करावा लागेल. उद्योग जगतातील ग्लोबल चॅम्पियनच्या गरेजूपासून ते रस्त्यावरील विक्रेत्यांपर्यंत सर्वांपर्यंत आरबीआयने पोहाेचले पाहिजे. 2047 मध्ये विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी आरबीआयची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत मोदी यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केंद्रात भाजपचे सरकार तिसऱ्यांदा स्थापन होईल असे स्पष्ट संकेत मुंबईतील भाषणातून दिले. या वेळी कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्यपाल रमेश बैस, मुकेश अंबानी, रामदास आठवले आदींची उपस्थिती होती.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT