PM Modi, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Thackeray Group News : ठाकरेंनी कुदळ मारलेल्या प्रकल्पांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते!

Jui Jadhav

Thackeray Group Shiv Sena News :

मुंबईमधील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अजून काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मुंबईच्या कोस्टल रोडचे उद्घाटनही आता मोदींच्या हस्ते होणार आहे.

पंतप्रधानांचा मुंबई दौरा

मुंबईकरांचा बहुप्रतीक्षित आणि बहुचार्चित कोस्टल रोडचे उद्घाटन येत्या 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईतील अनेक विकास कामांचे उद्घाटन PM Modi हस्ते होणार आहे. या उद्घाटनावरून आता श्रेयवाद रंगण्याची चिन्हे आहेत.

हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही मूळ कल्पना होती. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी झाली पाहिजे आणि त्यासाठी सागरी किनारे सुधारण्याची गरज आहे. त्यासाठी कोस्टल रोडची निर्मिती झाली. या कामासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी कामं केली. मात्र आता उद्घाटनासाठी पंतप्रधानांना बोलावण्यात येणार आहे. म्हणून श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते कोस्टल रोडच्या पाहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार असून 20 तारखेपासून नागरिकांसाठी हा सागरी मार्ग सुरू होणार आहे.

आदित्य ठाकरेंचा टोला

मुंबई कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. "कोस्टल रोडचा प्रस्ताव प्रथम उद्धव ठाकरेंनी जुलै 2013 मध्ये मांडला. त्यानंतर ह्या प्रस्तावाच्या परवानगीसाठी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. 2017-18 मध्ये कामाला सुरुवात झाली. 2022 मध्ये आमचे सरकार भेकड गद्दारांनी पाडले. पण तोपर्यंत 65 टक्के काम पूर्ण झाले होते', असे आदित्य म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'आम्ही दर आठवड्याला, प्रत्येक महिन्यात तेथे भेट देऊन कामाचा आढावा घेत होतो. कोविडच्या काळात भारतातले सर्वात मोठे टनेल बोरिंग मशीन आले. या मशीनला "मावळा" नाव दिले. TBMचे काम पाहिल्यावर लक्षात येते, मुंबईतला मलबार हिल फोडून समुद्राखालचा तो पहिला बोगदा बनवला गेला. TBM च्या ह्या कामाला साजेसं एकमेव नाव... मावळा! अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणेच, ज्यांनी महाराजांना अशक्य कामातही यशस्वी मदत केली', असे त्यांनी म्हटले.

'कोस्टल रोड आणि मुंबईशी अजिबात देणेघेणे नसलेल्या महाराष्ट्राची सत्ता बेकायदेशीररित्या बळकावणारे आणि मुंबईची लूट करणारे राजकारणी या अर्धवट काम राहिलेल्या कोस्टल रोडचे उद्घाटन करून निवडणुकीत श्रेय घेऊ पाहतील.

काम पूर्ण न झालेला कोस्टल रोड सुरू करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट ठरेल. पण राजकारणच करू पाहणाऱ्यांकडून दुसरी तरी काय अपेक्षा करणार? मुंबईचा वापर राजकारणासाठी केला जात आहे, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे', अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT