Brihanmumbai Municipal Corporation Buget 2024 :
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. मात्र या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे विषय सामोर आले. सगळ्यांना उत्सुकता होती ती मुदत ठेवी जाणून घेण्याची. मुदत ठेवींवर भाष्य करताना इकबाल सिंग चहल यांनी सगळे खापर माजी मुख्यमंत्री Uddhav Thackeray वर फोडले आहे. कोविड काळात या सर्व ठेवी वापरल्या गेल्याचा ठपका चहल यांनी ठेवला आहे.
'कोविड काळात ठेवी वापरल्या गेल्या'
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करत असताना आयुक्त इकबाल सिंग चहल यांना मुदत ठेवींवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी कोविड काळात सर्वाधिक ठेवी वापरल्या गेल्याचे सांगितले. 2020 साली मी मुंबई महापालिकेचा चार्ज घेतला. त्यावेळी मुंबईतील मुदत ठेवी 77 हजर कोटी इतक्या होत्या. मात्र आता त्या 86 हजार कोटी इतक्या झाल्या आहेत. मध्यंतरी कोविडच्या काळात 4000 कोटी वापरण्यात आले होते. अधिकचा खर्च या मुदत ठेवीच्या मदतीने करण्यात आला होता, असे चहल म्हणाले.
कोविड काळात संपूर्ण भारतावर कठीण प्रसंग ओढवला होता. मुंबईत त्याचा तीव्र परिणाम होऊ नये म्हणून जम्बो कोविड सेंटर सुरू केले होते आणि महापालिकेकडून इतरही सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे या सगळ्या खर्चात मुंबई महापालिकेचे मुदत ठेवीतील खर्च कमी झाल्याचा आरोप आयुक्तांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुदत ठेवींवरून ठाकरेंचे आरोप
मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी कमी होत असल्यावरून आरोप आणि टीका होत असतानाच आणखी दोन हजार कोटी रुपयांच्या ठेवी गेल्या पाच महिन्यांत, तर गेल्या वर्षभरात सुमारे आठ हजार कोटी रुपयांच्या ठेवी कमी झाल्या आहेत. 31 मार्च 2022 रोजी मुदतठेवींची रक्कम ही 91 हजार 690 कोटी रुपये होती. जून 2023 रोजी मुदतठेवी 86 हजार 467 कोटी रुपये होत्या. त्या नोव्हेंबर 2023 च्या अखेरपर्यंत 84 हजार 615 कोटींवर आल्या आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी मागील वर्षी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून याचा जाब विचारला होता. तसेच पालिकेत घोटाळ्यांचा आरोप केला होता. त्यावर आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन या आरोप फेटाळून लावले होते.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.