Narendra Modi Raj Thackeray Sabha  sarkarnama
मुंबई

PM Modi's Jahir Sabha at Shivaji Park : मोदींचे भाषण सुरू होताच राज ठाकरे, शिंदेंच्या सैनिकांचा सभेतून काढता पाय, नेमकं काय घडलं?

सरकारनामा ब्यूरो

वैदेही कानेकर

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवारांचे, काँग्रेसच आव्हान मोडीत काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने,विशेषत: पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांनी मनसेचे राज ठाकरेंना जवळ घेऊन नवीन समीकरण जुळवले. या समीकरणामुळे मुंबईती ठाकरेंना मानणारांना मतदार भाजपकडे वळेल, असे आराखडे बांधले गेले. त्यातूनच मुंबईतील मोदींच्या सभेत खास मान देऊन दिला. आणि राज ठाकरेंनीही मोदींच्या डोळ्या देखत जोरदार भाषण ठोकले. राज ठाकरेंच्या भाषणानंतर काही क्षणात मोदींचे भाषण सुरु झाले. मात्र मनसे, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पॅकअप केले अर्थात हळूहळू मनसे, शिंदेचे कार्यकर्ते सभास्थळावरू निघून गेले. परिणामी मोदी आणि राज ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या सभेमुळे एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या भाषणावेळी काढता पाय घेतला. याची चर्चा जोरदार झाली. त्यामुळे मोदींची सभा राज ठाकरेंचा पाठींबा शिंदेचे शक्तिप्रदर्शन तोंडदेखलेपणा होता का? असा सवाल देखील केला गेला.

आपल्या भाषणात मोदींवर Narendra Modi केलेल्या टीकेची आठवण देखील राज ठाकरे यांनी अप्रत्यक्ष करू दिली. मोदींच्या पहिल्या पाच वर्षांच्या कामगिरीरवर मी 2019 मध्ये बोललो होतो. मला असे वाटते टीकेच्या वेळी टीका प्रशंसाचे वेळी प्रशंसा करायला हवी. राज ठाकरेंनी Raj Thackeray मोदींकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची, अभ्यासक्रमात मराठी साम्राज्याचा इतिहासाचा समावेश करण्याची तसेच गडकिल्यांच्या संवर्धनाची मागणी केली.

शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर टीका

शिवतीर्थावरुन शिवसेना प्रमुखांची डरकाळी घूमत होती. त्याच उबाटाला हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटत आहे. हिंदू हृदयसम्राट म्हणण्यासही त्यांना लाज वाटत असून ही लाचारी मतांसाठी आहे, असा हल्लाबोल करत मोदींवर टीका करणारे अनेक रंग बदलणारे सरडे आम्ही आहेत. पण इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा कोणीही पाहिला नाही, अशी जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT