Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray News : पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच राज ठाकरेंनी घेतलं पंडित नेहरुंचं नाव

Narendra Modi : राज ठाकरेंनी मोदींकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची, अभ्यासक्रमात मराठी साम्राज्याचा इतिहासाचा समावेश करण्याची तसेच गडकिल्यांच्या संवर्धनाची मागणी केली.

Roshan More

Lok Sabha Election 2024 : महायुतीची प्रचारसभा मुंबईतील शिवतीर्थावर झाली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठींबा देणारे राज ठाकरे या सभेत तब्बल 21 वर्षानंतर मोदींसोबत एकाच व्यासपीठावर आले. त्यामुळे राज ठाकरे आपल्या भाषणात काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, राज ठाकरेंनी आपल्या भाषणात पहिल्याच शब्द उच्चारताच सगळे स्तब्ध झाले. कारण पंतप्रधान मोदी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर जाहीर कार्यक्रमांमधून टीका करतात. त्यांचे नाव पहिले राज ठाकरेंनी उच्चारले.

'पंडीत नेहरुंनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी Narendra Mod', या वाक्याने राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. आपल्या आक्रमक शैलीने विरोधकांचे समाचार घेणारे राज ठाकरेंनी मात्र आपल्या संपूर्ण भाषणात महाविकास आघाडीवर बोलण्याचे टाळले. राज ठाकरे म्हणाले, जे सत्तेत येणार नाहीत त्यांच्या विषयी बोलण्याची आवश्यकता नाही.

आपल्या भाषणात मोदींवर केलेल्या टीकेची आठवण देखील राज ठाकरे यांनी अप्रत्यक्ष करू दिली. मोदींच्या पहिल्या पाच वर्षांच्या कामगिरीरवर मी 2019 मध्ये बोललो होतो. मला असे वाटते टीकेच्या वेळी टीका प्रशंसाचे वेळी प्रशंसा करायला हवी. राज ठाकरेंनी मोदींकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची, अभ्यासक्रमात मराठी साम्राज्याचा इतिहासाचा समावेश करण्याची तसेच गडकिल्यांच्या संवर्धनाची मागणी केली.

मोदींना धन्यवाद

राज ठाकरे म्हणाले, मोदी नसते तर राम मंदिर झाले नसते. राम मंदिर मोदींमुळे होऊ शकले त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. भारतीय स्वातंत्र्यानंतर 370 कलम हटवण्याच्या गोष्टी ऐकत होतो मात्र ते पंतप्रधान मोदींनी हटवले. राजीव गांधी पंतप्रधान असताना न्यायलायने दिलेला निकाल लोकसभेत बहुमताच्या जोरावर शहा बानोच्या बाजुने दिलेला निकाल बदलून टाकला. मात्र मोदींनी तीन तलाकचा कायदाच रद्द करून टाकला. जी गोष्टी मोदींनी करून दाखवली त्यामुळे मुस्लीम महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT