Narendra Modi Sarkarnama
मुंबई

Shiv Sena News : काम शिवसेनेचे, मेहनत महापालिकेची अन् प्रचाराच्या चिपळ्या भाजपच्या !

PM Narendra Modi Mumbai Visit : मगरीच्या जबड्यात जाताना आताही बेडकं शेवटची डराव डराव करीत आहेत,असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

सरकारनामा ब्युरो

PM Narendra Modi Mumbai Visit : मुंबईतील (Mumbai)विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि पायाभरणीनिमित्त आज (गुरुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबईत येणार आहेत.

या दौऱ्यात मोदी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या प्रचाराची बिगुल वाजणणार असल्याची चर्चा आहे. यावरूनच शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून जोरहार हल्लाबोल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबईत येणार आहेत.

मोदींच्या या मुंबई दौऱ्यावर उपरोधिक टिप्पणी सामनातून करण्यात आली आहे. "काम शिवसेनेचे, मेहनत मुंबई महानगरपालिकेची आणि प्रचाराच्या चिपळ्या भाजपच्या," अशा शब्दात शिवसेनेने या दौऱ्यावर टीका केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जय्यत तयार भाजपने केली आहे. त्यात कुठे तरी अस्तित्व दाखवण्याचा मिंदे गटाने प्रयत्न केला आहे. पण मगरीने जसा बेडून गिळावा तसा हा गट गिळलेला आहे. मगरीच्या जबड्यात जाताना आताही बेडकं शेवटची डराव डराव करीत आहेत,असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

"मोदींच्या दौऱ्यानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या आवारात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी विद्यापीठाची सुरक्षा भिंत तोडली आहे. यावर मुंबईच्या भाग्योदयाची सुरूवात विद्यापीठाची भिंत तोडून झाली. मुंबईतील एका एका प्रमुख वास्तूवर हातोडे पडले जात आहेत, तरीही आमच्या पंतप्रधानाचं स्वागत असो, आहेच," असा टोला अग्रलेखात लगावला आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे..

  1. ज्या विकासकामंचे भूमिपुजन करणार आहेत. त्यातील बहुसंख्य प्रकल्प पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना पुढे सरकलेत.

  2. भांडुपच्या ज्या सुपर हाँस्पिटलचे उद्धघाटन पंतप्रधान करणार आहेत. त्या रुग्णालयासंदर्भातले वचन शिवसेनेने वचननाम्यात दिलेले आहे.

  3. प्रश्न श्रेयवादाचा नसून लोकांची दिशाभूल करण्याचा जो प्रकार सुरू झाला आहे.त्यावर परखड भूमिका घेण्याचा आहे.

  4. मोदींनी पक्षाच्या प्रचारासाठी व मुंबईतील शिवसेनेचा भगवा उतरवता येईल काय ? या भविष्यातील विचाराने ते येत आहेत.

  5. मोदींच्या दौऱ्या निमित्ताने लावलेल्या कटाऊट्समध्ये स्व बाळासाहेबांपेक्षा जास्त मोठे कटाऊट भाजप नेत्यांचे दिसत होते.

  6. स्वत:ला बाळासाहेबांची शिवसेना म्हणवून घेणारे मिंदेगट यावरही मुगगिळून बसले आहेत का ?

  7. मुख्यमंत्र्यांनी दावोसवरून १ लाख कोटीचे उद्योगकरार आणले. ते प्रत्यक्षात येण्यापूर्वी हे सरकार टिकेल का ?

  8. मुंबईत कडक नाकेबंदी करण्यात येत आहे. पंतप्रधान मुंबईत आहे तोपर्यत चिटपाखरूही आकाशात उडू देणार नाहीत.

  9. महाराष्ट्रातून सव्वादोन लाख कोटींचे प्रकल्प पळवून नेले. हा मुंबईवर आर्थिक आघात आहे.

  10. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या तोंडचा घास पळवून नेला. यालाच मुंबई महाराष्ट्राचे भाग्योदय म्हणायचे का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT