Anil Deshmukh
Anil Deshmukh Sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका

सरकारनामा ब्युरो

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा आर्थर रोड तुरूंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. करचुकवेगिरी प्रतिबंधक विशेष न्यायालयाने देशमुखांचा जामीन फेटाळला आहे. करचुकवेगिरी प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाकडून (ED) आरोपपत्र दाखल केल्याने डिफॉल्ट जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेमार्फत 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी झालेल्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना अटक केली होती. या प्रकरणी देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

डिफॉल्ट जामीन मिळावा, यासाठी देशमुखांनी 4 जानेवारीला विशेष न्यायालयात अर्ज केला होता. ईडीने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्याने जामीन मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली. देशमुख हे गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली होती. तब्बल 12 तास चौकशी झाल्यानंतर त्यांना त्याचदिवशी अटक झाली होती. तेव्हापासून ते तुरूंगात आहेत.

कर चुकवेगिरी प्रकरणातही देशमुखांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात तब्बल 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) प्राथमिक तपासात क्लीन चिट दिल्याचा अहवाल फोडल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने देशमुखांच्या चैाकशीचे आदेश नुकतेच दिले आहेत. सीबीआयच्या आरोपपत्रात देशमुख यांना आरोपी बनवलेले नसले तरी ते मोठ्या कटाचा भाग असू शकतात. कारण, त्यांना या प्रकरणातील माहिती लीक झाल्याचा सर्वाधिक फायदा झाल्याचे दिसत आहे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT