भाजपचा मुहूर्त निघत नसताना गोव्यात काँग्रेसने मारली बाजी!

गोव्यातील (Goa) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीत काँग्रेने (Congress) बाजी मारली आहे.
BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama

पणजी : गोव्यातील (Goa) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीत काँग्रेने (Congress) बाजी मारली आहे. भाजपचा (BJP) पहिली यादी जाहीर करण्याचा मुहूर्त निघत नसताना काँग्रेसने आज अंतिम यादी जाहीर करुन बाजी मारली आहे. या यादीत 8 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपमधून आलेले नेते आणि पक्षात दाखल झालेल्या अपक्ष आमदारांना स्थान देण्यात आले आहे.

गोव्यातील 40 जागांसाठी काँग्रेसने आज अंतिम यादी जाहीर केली आहे. ही तिसरी यादी असून, यात 8 उमेदवारांचा समावेश आहे. बिचोलीम - मेघश्याम राऊत, तिविम - अमन लोटलीकर, कळंगुट - मायकेल लोबो, पर्वरी - विकास प्रभुदेसाई, सेंट आंद्रे - अँटनी एल. फर्नांडिस, सेंकेलिम - धर्मेश सगलानी, मार्केम - लव्हू मामलेकर, सेंगुएम - प्रसाद गावकर, कानकोन - जनार्दन भंडारी यांचा या यादीत समावेश आहे.

BJP and Congress
भाजप सोडताच बड्या नेत्यानं काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याची मागितली शंभर वेळा माफी!

भाजपमधून मंत्रिपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये आलेले मायकल लोबो (Michael Lobo) यांना तिकिट मिळाले आहे. मायकल लोबो हे कळंगुट मतदारसंघाचे आमदार होते. तर त्यांच्या पत्नी सरपंच असून भाजपच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष होत्या. दोघांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होता. मायकल लोबो यांचा उत्तर गोव्यात मोठा दबदबा असल्याने त्यांचा काँग्रेस प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का होता.

BJP and Congress
करोडोंचा गंडा घालणारा विशाल फटे 'बिग बुल' बनून आला पोलिसांसमोर!

याचबरोबर अपक्ष आमदार प्रसाद गावकर (Prasad Gaonkar) यांचेही यादीत नाव आहे. त्यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सेंगुएम मतदारसंघाचे ते आमदार आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला होता. नुकतीच गावकर यांनी दिल्लीत पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी काँग्रेस प्रवेशाची घोषणा केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com