Ketaki Chitale
Ketaki Chitale 
मुंबई

केतकी चितळे प्रकरणाला वेगळे वळण: त्या' मेसेजचीही चौकशी होणार

सरकारनामा ब्युरो

Ketaki Chitale latest news

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेने केलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणाला नवे वळण लागले आहे. पोलीस तपासात काही गोष्टी समोर आल्या आहेत. केतकीने जो मेसेज फेसबुकवर शेअर केला होता. तो कोणी पाठवला किंवा कोणत्या ग्रुपवरून आला होता, अशा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ठाणे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केतकी व्हॉटसअॅप वापरत नव्हती, पण ती सोशल मीडिया सक्रीय असते. त्यामुळे ती इतरांशी संपर्कात राहण्यासाठी कशाचा वापर करत होती, केतकीला कोणत्या व्यक्तीने किंवा ग्रुपवर ती पोस्ट मिळाली, या सर्वांचा पोलीस तपास करणार आहे. यासाठी पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉपही जप्त केला आहे. तसेच केतकीने मोबाईलमधील मेसेज डिलीट केले असण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. त्याचबरोबर केतकीने २०२० ची फेसबुकवरची पोस्ट तिने आता का शेअर केली याचाही शोध घेतला जाणार आहे.

दरम्यान, ठाणे क्राईम ब्रांचने केतकीवर आयटी अॅक्ट कलम 66 नुसारही गुन्हा दाखल केला आहे. तर केतकी चितळेला आज ठाणे सत्र न्यायालयात (Court) हजर करण्यात आले. ठाणे न्यायालयाने केतकीला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे तिचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

तर केतकीविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ्य नेत्यावर खालच्या भाषेत टीका करणे खपवून घेणार नाही, असाच इशाराच राष्ट्रवादीने दिला आहे. तर राज्यात ठिकाणी केतकीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याने संबंधित पोलिसांकडून केतकी चितळेचा ताबा मागितला जाऊ शकतो. त्यामुळे केतकी चितळे आणखी काही न्यायलयीन कोठडीत राहण्याची शक्यता आहे. आता येत्या काही दिवसांत पोलीस केतकीविरोधात कोणते नवे पुरावे सादर करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT