केतकी चितळेचा तुरुंगातील मुक्काम वाढला

Ketaki Chitale| Sharad Pawar| शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ्य नेत्यावर खालच्या भाषेत टीका करणे खपवून घेणार नाही, असाच इशाराच राष्ट्रवादीने दिला आहे
Ketaki Chitale|
Ketaki Chitale|

Ketaki chitale latest news

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेली अभिनेत्री केतकी चितळेला आज ठाणे सत्र न्यायालयात (Court) हजर करण्यात आले. ठाणे न्यायालयाने केतकीला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. यावेळी न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

दरम्यान मुंबईतील भोईवाडा, पवई आणि गोरेगाव पोलीस ठाण्याततही केतकीविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतल्यानंतर ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ कडून केतकीची पोलीस कोठडीत कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी तिच्या घराची तपासणी करताना तिचा लॅपटॉप आणि इतर गोष्टीही जप्त केल्या. केतकीचा मोबाईलही पोलिसांच्या ताब्यात आहे. सायबर सेलने तिच्या लॅपटॉप आणि मोबाईलची तपासणी करुन अहवाल ठाणे गुन्हे शाखेला पाठवला आहे. मात्र, या अहवालातील तपशील अद्याप समोर आलेला नाही.

Ketaki Chitale|
भाजप आता ‘त्या’ पाच गद्दारांना सोडणार नाही, दाखल केली याचिका...

दरम्यान, केतकीविरोधात कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ्य नेत्यावर खालच्या भाषेत टीका करणे खपवून घेणार नाही, असाच इशाराच राष्ट्रवादीने दिला आहे. तर राज्यात ठिकाणी केतकीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याने संबंधित पोलिसांकडून केतकी चितळेचा ताबा मागितला जाऊ शकतो. त्यामुळे केतकी चितळे आणखी काही न्यायलयीन कोठडीत राहण्याची शक्यता आहे. आता येत्या काही दिवसांत पोलीस केतकीविरोधात कोणते नवे पुरावे सादर करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रविवारी न्यायालयाने तिला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. सुनावणी दरम्यान केतकीने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकील घेतला नाही. तिने स्वत:च न्यायालयात बाजू मांडली. "मी त्या मतांवर ठाम असून मी माझी पोस्ट डिलीट करणार नाही, मला बोलण्याचं, मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही का? मी ती पोस्ट स्वत: लिहिली नाही. मी ती कुठूनतरी कॉपी केली आहे. पण ती स्वखुशीनं पोस्ट केली असल्याचेही केतकीनं तिने स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com