Kamlesh Rai with Eknath Shinde 
मुंबई

Kamlesh Rai: शिंदेंच्या शिवसेना नेत्याला पाच लाखांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं! पोलीस कोठडीत रवानगी

Kamlesh Rai: शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून राय याला पाच लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहाथ पकडलं.

Amit Ujagare

Kamlesh Rai Arrested : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याला पाच लाख रुपयांची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोर्टानं या नेत्याला पोलीस कोठडी सुनावली.

शिवसेनेचा माजी नगरसेवक कमलेश राय यानं खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून राय याला पाच लाख रुपयांची खंडणी घेताना रंगेहाथ पकडलं. मात्र, अटक झाल्यानंतर कमलेश रायची तब्येत बिघडल्यामुळं महापालिकेच्या कूपर रुग्णालयात दोन दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर आज एमआयडीसी पोलिसांनी अटक आरोपीला अंधेरी कोर्टात हजर केलं. यावेळी पोलिसांनी आठ लाख रुपये रिकव्हर करण्यासाठी कोर्टाकडं पाच दिवसाची पोलीस कोठडी मागितली. कोर्टानं आरोपी कमलेश राय याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, एका बांधकाम साइटवरून कमलेश राय यानं ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पहिल्या टप्प्यात आठ लाख रुपयांची खंडणी त्यानं स्वीकारली होती. त्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील पाच लाख रुपये स्वीकारताना पोलिसांनी सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडलं. एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करत अटक केली.

कोण आहे कमलेश राय?

शिवसेना शिंदे गटाचा कमलेश राय हा माजी नगरसेवक आहे. त्याच्याविरोधात यापूर्वीही वादग्रस्त कारभाराबाबत तक्रारी होत्या. आता थेट खंडणीसारख्या गंभीर आरोपात त्याला अटक झाली आहे. त्याच्या सोबत या व्यवहारात आणखी कोणी सामील आहे का? याचा तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT