Uddhav Thackeray: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही तासांतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून मोठी अपडेट; राहुल गांधींसोबत...

Shivsena UBT : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही तासांतच आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'टॉपचा गिअर' टाकल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनंतर आता महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंचाही दिल्ली दौरा चांगलाच चर्चेत आला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : सर्वोच्च न्यायालयाने नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. त्यामुळे गेल्या 7 वर्षांपासून निवडणुकांच्या प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग एकप्रकारे मोकळा झाला आहे.या निर्णयानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग घेतल्याचं दिसून येत आहे. याचदरम्यान,उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेतून एक मोठी अपडेट समोर येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही तासांतच आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'टॉपचा गिअर' टाकल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनंतर आता महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंचाही दिल्ली दौरा चांगलाच चर्चेत आला आहे.

Uddhav Thackeray
Nishikant Dubey: ठाकरे बंधू अन् मराठी माणसाला ठरवून टार्गेट करणाऱ्या निशिकांत दुबेंना फडणवीसांनी फटकारलं; म्हणाले...'

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.यावेळी न्यायालयानं नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यास निवडणुका घेण्यास ग्रीन सिग्नल दर्शवला आहे.

याचदरम्यान, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या दौऱ्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी ठाकरेंना भोजनाचे आमंत्रणही देण्यात आल्याचं बोललं जात आहे.

Uddhav Thackeray
Manoj Jarange Patil : धक्कादायक! लिफ्टला परवानगीच नव्हती! जरांगे पाटील यांच्या अपघाताच्या घटनेमुळे रुग्णालयाची गोची, आता होणार इन्स्पेक्शन

उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून एकही बैठक न झालेल्या इंडिया आघाडीची लवकरच बैठक व्हावी अशी मागणी केली होती.त्यानंतर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर इंडिया आघाडीची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक 24 पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतरचा हा पहिलाचा उद्धव ठाकरेंचा असल्यानं महत्त्वाचा मानला जात आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-शिवसेना युतीची चर्चा जोरदारपणे सुरू असताना उद्धव ठाकरेंची दिल्लीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत डिनरडिप्लोमसी होत असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : ‘स्थानिक’च्या निवडणुका 2017 प्रमाणेच होणार! सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर फडणवीसांनीही केलं स्पष्ट...

उद्धव ठाकरे 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी दिल्लीत पोहचणार आहे. त्यानंतर 7 तारखेला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक होणार आहे. सध्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं दिल्लीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांची ठाकरेंसोबत दिल्ली दौऱ्यादरम्यान बैठक होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही. बिहारसह इतर राज्यांत निवडणुका आहेत. महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे, असे मत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच व्यक्त केले होते. उद्धव ठाकरेंच्या या मागणीची दिल्लीने दखल घेतल्याची माहिती मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com