Arthur Road Jail Sarkarnama
मुंबई

Arthur Road Jail : आर्थर रोड कारागृहातील कैद्याला ड्रग्ज पुरवणं भोवलं; पोलीस हवालदार निलंबित

Arthur Road Jail Constable News: कारागृहातील पोलीस हवालदारच कैद्याला ड्रग्ज पुरवत असल्याची धक्कादाक माहिती समोर आली आहे.

Ganesh Thombare

Mumbai Crime News : मुंबईतील आर्थर रोड कारागृहात अंमली पदार्थांची तस्करीचे प्रकरण समोर आले असून या प्रकरणात पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील आर्थर रोड कारागृहात अमली पदार्थ लपवून नेणारा पोलीस हवालदार विवेक नाईक याला निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्याच्या येरवडा कारागृहात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. आता मुंबईतील आर्थर रोड कारागृहातही अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

मात्र, या प्रकरणात कारागृहातील पोलीस हवालदारच असल्याची धक्कादायक बाब समोर आली. या पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात पोलीस हवालदार विवेक नाईक याने अंतर्वस्त्रात लपवून अमली पदार्थ नेले होते. तर ६ ऑक्टोबरला रात्री कारागृहातील हवालदार दीपक सावंत हे गस्त घालत होते. यावेळी शिपाई नाईक याची तपासणी सावंत यांनी केली.

यावेळी पोलीस हवालदार नाईक याने अंर्तवस्त्रात काहीतरी लपवले असल्याचे उघडकीस आले. यानंतर नाईकने सावंत यांना विरोध केला. तसेच नाईकने कारागृहातील प्रवेशद्वारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सावंत यांनी त्याला ताब्यात घेतले.

त्यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला कारागृह अधीक्षक कार्यालयात नेले आणि त्याची पु्न्हा तपासणी केली. यावेळी नाईक याने अंतर्वस्त्रात प्लास्टिकची पिशवी ठेवली होती. त्या पिशवीत आठ कॅप्सुल सापडल्या असून या कॅप्सुल उघडल्यानंतर त्यात अंमली पदार्थ लपविल्याचे समोर आले.

यावेळी नाईक या पोलीस हवालदाराकडून ७१ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले. यानंतर आता या पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी नाईक याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT