PCMC News : ऑनलाईन जुगारात करोडपती झालेल्या पीएसआय झेंडेंच्या अडचणी वाढल्या ; भाजपची गृहमंत्र्यांकडे तक्रार

PSI Somnath Zende News : झेंडेंच्या अडचणी वाढण्याचे संकेत मिळाले आहेत.
PSI Somnath Zende, Amol Thorat News
PSI Somnath Zende, Amol Thorat NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : सध्या सुरू असलेल्या वन डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतील कालच्या इंग्लड विरुद्ध बांग्लादेशच्या मॅचवरील ड्रीम इलेव्हन या मोबाईल गेमिंग अॅपवर पिंपरी-चिंचवडमधील तरुण पीएसआय सोमनाथ झेंडे याने तब्बल दीड कोटी रुपये जिंकले. मात्र, आज लगेच त्याच्याविरुद्ध थेट राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडेच तक्रार करण्यात आल्याने झेंडेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पिंपरी-चिंचवड भाजपचे माजी संघटन सरचिटणीस अमोल थोरात (Amol Thorat) यांनी झेंडेविरुद्ध ही तक्रार दिली असून ते ऑनड्यूटी ऑनलाइन जुगार खेळत असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. त्याची लगेचच दखल घेण्यात येऊन त्यांना मंत्रालयात येण्यास सांगण्यात आल्याने झेंडेंच्या अडचणी वाढण्याचे संकेत मिळाले आहेत.

PSI Somnath Zende, Amol Thorat News
Shivsena Politics: शिवसेनेतील धुसफूस चव्हाट्यावर; थेट जिल्हा प्रमुखांनाच पदावरून हटवण्याची मागणी

ऑनलाइन जुगार वा गेम यापासून तरुण पिढीला वाचविण्यासाठी शासन व विविध घटकांकडून उपक्रम राबविले जात असताना झेंडे हे ऑनड्यूटी ऑनलाइन जुगार कसा खेळतात, अशी विचारणा थोरात यांनी केली आहे. एवढेच नाही, तर त्यात मिळालेल्या रकमेचा गाजावाजा करून त्यांनी ऑनलाइन जुगाराला चालना देण्याचे काम केले आहे. त्यातून लहान मुलांना ऑनलाइन जुगार व गेम खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळून त्यांचे आयुष्य बरबाद होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

ऑनलाइन जुगारामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यावर बंदी आणण्यासाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू असताना कायद्याचा रक्षक म्हणवणाऱ्या पोलिसानेच ऑनड्यूटी ऑनलाइन जुगार खेळणे हे पोलीस (Police) दलासाठी मोठी लाजिरवाणी बाब आहे,असा हल्लाबोल थोरातांनी केला आहे. झेंडेने सोशल मीडियावर स्वत:चे खाकी गणवेशातील फोटो व व्हिडिओ व्हायरल करून राज्याच्या पोलीस दलाबाबत चुकीचा संदेश दिला आहे, असे ते म्हणाले.

झेंडे हा चाकण पोलीस ठाण्यात असताना त्याच्यावर एसीबीने कारवाई केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. निलंबन संपून पुन्हा कामावर हजर झाल्यावर त्याने कर्तव्यात कसूर केल्याचे यानिमित्ताने समोर आल्याने त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी थोरातांनी गृहमंत्री फडवणवीसांकडे केली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

PSI Somnath Zende, Amol Thorat News
PCMC News : आमदार अश्विनी जगतापांच्या अपमानाचा वाद पेटला ; शहर सरचिटणीस ढाकेंच्या राजीनाम्याची मागणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com