Mangesh Kudalkar's wife News, Rajani Kudalkar death Case Updates,
Mangesh Kudalkar's wife News, Rajani Kudalkar death Case Updates,  Sarkarnama
मुंबई

शिवसेना आमदाराच्या पत्नीच्या आमहत्येचं गूढ वाढलं; मुलाला केलेला मेसेज आला समोर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (Shivsena) आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या पत्नीने 17 एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कुडाळकर यांच्या पत्नीचे नाव रजनी (वय ४२) असे आहे. ही घटना कुडाळकर यांच्या राहत्या घरात घडली होती. रजनी यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्या मुलाला केलेला मेसेज आता समोर आला असून, यात एका महिलेच्या नावाचा उल्लेख आहे. यामुळे या प्रकरणातील गूढ वाढलं आहे. (Rajani Kudalkar death Case Updates)

रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मुलाला एक मेसेज केला होता. हा मेसेज पोलिसांनी (Police) मिळाला आहे. यात त्यांनी एका महिलेच्या नावाचा उल्लेख केला होता. माझं काही बरंवाईट झाल्यासं ही महिला जबाबदार असेल, असं त्यांनी म्हटलं होत. त्यामुळे ही महिला रजनी यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याची शक्यता समोर येत आहे. या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यामुळं या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालं आहे.

मेसेजमधील महिला कोण?

रजनी कुडाळकर यांनी थेट आपल्या मुलाला मेसेज पाठवून उल्लेख केलेली महिला कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या महिलेचा कुडाळकर कुटुंबीयांशी काय संबंध होता, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल रजनी यांना जिच्यामुळं उचलावं लागलं त्या महिलेचा एकूण काय संबंध होता, याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.

रजनी कुडाळकर यांनी 17 एप्रिलला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रजनी यांच्या आत्महत्येचे नेमके कारण उद्याप उघड झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी रजनी यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. हा अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT