भाजप आमदाराच्या गाडीनं दोघांना चिरडलं अन् ड्रायव्हर काही तासांतच जामिनावर सुटला

भाजप आमदाराच्या गाडीखाली दोन जण चिरडले गेल्यानं खळबळ उडाली आहे.
BJP MLA Yogesh Verma News, UP Political News Updates
BJP MLA Yogesh Verma News, UP Political News UpdatesSarkarnama
Published on: 
Updated on: 

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. आता भाजपच्या (BJP) एका आमदाराच्या गाडीखाली दोन जण चिरडले गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आमदाराचे नाव योगेश वर्मा असे आहे. ही घटना 17 एप्रिलला रात्री लखीमपूर खीरीमध्ये घडली. या प्रकरणी अटक केलेल्या गाडीच्या ड्रायव्हरची काही तासांतच जामिनावर सुटका झाली आहे. (UP Political News Updates)

या अपघातातील स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. या अपघातानंतर गाडीचा चालक मुनिंदरकुमार हा पळून गेला होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील राजकारण तापले आहे. विरोधकांनी लखीमपूर खीरीतच घडलेल्या या घटनेवरुन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप सरकारची कोंडी करण्यास सुरवात केली आहे.

BJP MLA Yogesh Verma News, UP Political News Updates
महिला आयोगाचे निर्देश असले तरी नाईकांना अटक नाही! पोलीस आयुक्तांनीच सांगितलं कारण

मृत्यू झालेल्यांची नावे रवी वर्मा (वय 26) आणि विक्रम वर्मा (वय 22) अशी आहेत. ते चुलतभाऊ होते. रवी हा विवाहित होता आणि त्याच्या मागे पत्नी एक अपत्य आहे. आमदार योगेश वर्मा हे १७ एप्रिलला रात्री विवाह सोहळ्याला हजेरी लावून त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीतून जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. या अपघातात मृत्यू झालेले चुलतभाऊही विवाह सोहळ्याला हजेरी लावायला जात होते. ते दुचाकीवरून जात होते. त्यांना पंकीपूर पेट्रोल पंपाजवळ स्कॉर्पिओने धडक दिली. दोघांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले पण तिथे पोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

BJP MLA Yogesh Verma News, UP Political News Updates
भाजपचा बडा नेता अडचणीत! चाकणकरांनी दिले अटकेचे पोलिसांना निर्देश

लखीमपूर खीरी येथे गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने (Ashish Mishra) हे कृत्य केले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. आशिषची 10 फेब्रुवारीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. त्याच्या विरोधात मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. यावर आशिषचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने आजच रद्द केला आहे. तसेच एक आठवड्याच्या आत शरण येण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com