Prabhakar Sail
Prabhakar Sail sarkarnama
मुंबई

वानखेडेंना अडचणीत आणणारा प्रभाकर साईल आता मुंबई पोलिसांच्या संरक्षणात

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : क्रूझ पार्टीप्रकरणी मोठा गौप्यस्फोट करणारे पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी जीवाला धोका असल्याचे सांगत मुंबई पोलिसांना देण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना संरक्षण देण्यात आहे. त्याच बरोबर प्रभाकर साईल यांची तक्रार नोंदवून गुन्हा नोंदवण्याचे आदेश वरिष्ठा पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

साईल यांच्या वकिलांनी सांगितले की, साईल यांनी सहार पोलिसांकडे माहिती नोंदवली आहे. आम्ही सुरक्षेच्या मागणीसाठी गेलो होतो. आम्हाला पोलिसांनी सुरक्षा दिली आहे. क्राईम ब्रँचकडे सर्व पुरावे जमा केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता आर्यन खान प्रकरणाला वेगळे लागले आहे. दरम्यान, या प्रकरणातील पंच किरण गोसावीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याचे साईलने रविवारी ड्रग्ज प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले होते.

साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यनला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला आहे. वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी सांगितले होते. आपल्या जीवाला धोका असल्याने एवढे दिवस आपण गप्प होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता.

क्रूझ पार्टीप्रकरणात पुरावे म्हणून साईलने काही फोटो आणि व्हिडीओ देखील सादर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये आर्यनला अटक करून एनसीबी कार्यालयात आणल्यानंतर गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याच्या फोनवरून कुणाशी तरी बोलण करून देत असल्याचे दिसत होते. साईल यांच्या भेटीनंतर त्यांना मुंबई पोलिस संरक्षण देणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT