St Strike |CSMT Railway station
St Strike |CSMT Railway station Sarkarnama
मुंबई

पोलिसांनी वडापाव स्ट्रॅटेजी वापरली अन् कर्मचारी अलगद जाळ्यात आले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर गेल्या पाच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. अशातच गुरुवारी न्यायालयाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचारी अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला केला.

पोलिसांनी आक्रमक कर्मचाऱ्यांवर नियंत्रण मिळवत त्यांना आझाद मैदानात नेले. आझाद मैदानातही मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. आज पहाटे या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आझाद मैदानातून बाहेर काढलं होतं. यावेळी आक्रमक कर्मचाऱ्यांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाचा आसरा घेत तिथेच ठिय्या सुरु केला. कर्मचाऱ्यांना रेल्वे स्थानकातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी गनिमी काव्याचा वापर केला.त्यासाठी त्यांनी वडापाव स्ट्रॅटेजी वापरली.

आझाद मैदानातून पोलिसांनी बाहेर काढल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकाचा आसरा घेतला आणि त्यांनी रेल्वे स्थानकातही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला कर्मचारी आक्रमक होऊ नयेत म्हणून पोलिसांनी देखील नरमाईची भूमिका घेतली. पण त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू झालेला हैदोस पोलिसांनी शांत करण्याचा निर्णय घेतला. एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना '१०० वडापावची ऑर्डर दिली, सगळ्यांनी १८ नंबर फलाटावर चला' आणि तिथेच तुम्ही आंदोलनासाठी बसा असंही या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी सांगितले.

या आमिषाला बळी पडत कर्मचारी १८ क्रमांक फलाटावर गेले, तेव्हा या आलेल्या एसटी कर्मचारी पोलिसांच्या सापळ्यात अडकले आणि त्यानंतर पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना आपल्या ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेलं. गनिमी काव्याने पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. १८ नंबर फलाट मोकळं आणि सुटसुटीत आहे. तिथे गाड्यांना पार्किंगसाठी मोठी जागा आहे, पळून जाण्यास तिथे कोणताच मार्ग नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना ताब्यात घेणं सोप्पं होतं. पोलिसांनी लगेच कर्मचाऱ्यांना तिथे नेऊन आपला हेतू साध्य केला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वडापावची हाव अंगलट आल्याची चर्चा सध्या आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT