वसंत मोरेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद; हात जोडून विनंती करतो...

MNS| Vasant More| Raj Thackeray| दोन दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांना पदावरुन हटवण्यात आले आहे.
MNS| Vasant More|
MNS| Vasant More|Sarkarnama

पुणे : गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याची मागणी केली. त्यावर राज्य तसेच देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनीही यास विरोध केला होता. पक्षाचे पुण्यातील (Pune) शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत मला माझ्या प्रभागात शांतता हवी, असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या वक्तव्याविरोधात शुक्रवारी (८ एप्रिल) पुण्यातील कोंढवा परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज ठाकरे मुर्दाबाद, साईनाथ बाबर मुर्दाबाद तर वसंत मोरे जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीनंतर वसंत मोरे यांनी स्वत: एका व्हिडीओच्या माध्यमातून राज ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देऊ नका, अशी विनंती केली आहे.

काय म्हणाले वसंत मोरे?

''एक लोकप्रतिनीधी म्हणून पहिल्या दिवसापासून माझ्या प्रभाग शांत राहावा अशी माझी भूमिका होती. पण गुडीपाडव्याचा दिवशी जो विषय झाला, त्यानंतर मी जे बोललो त्याचा प्रसार माध्यमांमध्ये विपर्यास झाला. असा सुर कुठेतरी उठला, मी राज ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेतली असा कुठेतरी समज निर्माण झाला, काल कोंढवा परिसरात मुस्लिम बांधवांनी मोर्चाचे आयोजन केले होते.

त्यात वसंत मोरे जिंदाबाद तर राज ठाकरे मुर्दाबाद, साईनाथ बाबर मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या गेल्या. हे ऐकून मनाला खूप वेदना झाल्या.राज साहेब जिंदाबाद होते आणि जिंदाबाद राहतील. पण माझी तुम्हाला एकच विनंती आहे की, समाजात कोणतीही दुफळी निर्माण होणार नाही, वादंग होणार नाही, ही माझी मुस्लिम समाजाला विनंती आहे. म्हणून मी विंनती करतो की राज ठाकरे मुर्दाबाद च्या घोषणा देऊ नका, त्यामुळे माझ्या मनाला अनंत वेदना होतात. अशी भावना यावेळी वसंत मोरे यांनी व्यक्त केली.

- विरोधी भूमिकेमुळे वसंत मोरेंना पदावरून हटवण्यात आले

दरम्यान, मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयावर वसंत मोरे (Vasant More)यांनी नाराजी व्यक्त केल्यातनंतर पक्षाच्या शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरेंना गुरुवारी (७ एप्रिल) हटवण्यात आले. माजी नगरसेवक व मोरे यांचे जवळचे मित्र साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.

त्यानंतर ''माझ्या शहराध्यक्षपदाची मुदत एक वर्षाची होती. जी मार्चमध्ये संपली आहे. त्यामुळे नव्या शहराध्यक्षांची निवड झाली तरी काही बिघडत नाही. आमच्याकडे राज ठाकरे यांचा शब्द अंतीम असतो. वसंत मोरेंच्या निष्ठा अजूनही राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाण्यातल्या उत्तरसभेला मी जाणार आहे,'' असे वसंत मोरे (Vasant More) यांनी काल स्पष्टीकरण दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com