BMC Election Politics: Sarkarnama
मुंबई

BMC Election Politics: विकासनिधीवरुन राजकारण तापलं! ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचा इशारा

मुंबई महापालिका निवडणुका जाहीर झालेल्या नसतानाही सर्व राजकीय पक्षांना आता या निवडणुकांचे वेध लागले आहेत.

सरकारनामा ब्युरो

BMC Election Politics: मुंबई महापालिका निवडणुका जाहीर झालेल्या नसतानाही सर्व राजकीय पक्षांना आता या निवडणुकांचे वेध लागले आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिका मिळवण्यासाठी भाजप महाविकास आघाडीने पक्षांतर्गत तयारी सुरु केली आहे. तर मुंबईतील विकासकामांवरुन आता राजकारण सुरु झालं आहे.

मुंबई महापालिकेत भाजपच्या माजी नगरसेवकांना जादाचा विकासनिधी दिल्याचा आरोप ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांकडून करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर ठाकरे गटाने न्यायालयातही जाण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या माजी नगसेवकांनी नुकतीच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचीही भेट घेतली. महापालिकेकडून माजी नगरसेवकांना विकासनिधी देताना भाजपच्या माजी नगरसेवकांना जादा निधी देत राज्यातील सत्ताधाऱ्यांची मर्जी राखण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप ठाकरे गटाच्या नेगरसेवकांनी केला आहे.

आगामी महापालिका निवडणुसाठी आतापासूनच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. तर मुंबई महापालिकेने भाजपच्या माजी नगरसेवकांना जादा विकासनिधी दिल्याचा दावा आरोप ठाकरे गटाच्या नगरसेवक करत असून त्यांनी महापालिकेच्या मुंबई महापालिकेच्या या कारभारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात भाजपच्या माजी नगरसेवकांना प्रत्येकी ३ कोटींचा निधी तर ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेवकांना केवळ १ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. तसेच, भाजप नगरसेवकांच्या प्रभागांत अतिरिक्त निधीची तरतूद करण्यासंदर्भातही पालिकेच्या कामकाजावर माजी नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

इतकेच नव्हे तर, अद्यात पालिकेच्या प्रभागांच्या सीमा निश्चित नसताना आणि नगरसेवकांचा कार्यकाळ संपला असतानाही पालिकेने निधीवाटप केले, असाही आरोप माजी नगरसेवकांकडून होतं आहे. तसेच महापालिकेच्या स्थायी समितीत २०२२-२३ वर्षांचा अर्थसंकल्पातील आर्थिक तरतुदीला भाजपचा विरोध होता. पण यावेळी मात्र भाजपने अर्थसंकल्पाचे स्वागत केलं आहे. आता निधी वाटपावरून सुरू झालेल्या या वादात पालिका आयुक्त काय भूमिरा घेतात या भूमिकेकडे सगळ्याचं लक्षं लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT