BJP नेत्याचा 'पराक्रम' ; तो VIDEO हायरल, नेटकरी संतप्त, 'महिला पोलिसासोबत ..

BJP MLA pushes woman policeman : "मी तुमच्या कानशीलात मारेन,"
BJP MLA pushes woman policeman
BJP MLA pushes woman policeman Sarkarnama

BJP MLA pushes woman policeman: ओडिशातील (odisha) भाजपच्या (bjp) एका बड्या नेत्याचा महिला पोलिस अधिकाऱ्यांसोबत असभ्य वर्तन करण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरुन भाजपवर नेटकरी जोरदार हल्लाबोल करीत आहेत.

बुधवारी एका आंदोलनाच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. भाजपचे नेते, ओडिशाचे विरोधी पक्षनेते जयनारायण मिश्रा यांचा तो व्हिडिओ आहे. ते धनुपाली पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकारी अनिता प्रधान यांना असभ्य भाषेत संवाद साधत आहे. "मी तुमच्या कानशीलात मारेन," अशी धमकी मिश्रा देत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून केलेले आरोप मिश्रा यांनी फेटाळले आहेत.

BJP MLA pushes woman policeman
BJP :'मुस्लिम वोट बँक' साठी भाजप सूफी-संतांच्या चरणी..; लोकसभेसाठी असा आहे मास्टर प्लॅन

या व्हिडिओमध्ये मिश्रा हे एका महिला पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालताना दिसतात. त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी ते अनिता प्रधान यांना म्हणाले, "मी तुमच्या कानशीलात मारेन," पोलिस आणि मिश्रा यांच्या समर्थकांमध्ये यावेळी शाब्दीक युद्ध झाल्याचे दिसते. तर दुसरीकडे आमदार जयनारायण मिश्रा यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या वाईट वागणूक दिल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे.

BJP MLA pushes woman policeman
IT Survey on BBC: बीबीसीचे महत्वाचे दस्ताऐवज IT च्या ताब्यात ; ६० तास चौकशी..

या प्रकरणाची ओडिशाची जोरदार चर्चा होत आहे. संबलपूर पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत अहवाल मागितला आहे. संबधित दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. बीजू जनता दल (bjd) ने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. मिश्रा आणि भाजपवर टीका केली आहे.

"ओडिशाच्या विरोधीपक्ष नेत्यांना एका महिला पोलिस अधिकाऱ्यांसोबत असा व्यवहार करणे चुकीचे आहे. मिश्रा यांचे व्यक्तीगत रेकाँर्ड वादग्रस्त आहे. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत,"असे टि्वट बीजू जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ता अमर पटनायक यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com