Palghar Zilla Parishad
Palghar Zilla Parishad sarkarnama
मुंबई

पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक गाजतेय खासदार पुत्रामुळे

संदीप पंडित

विरार : पालघर (Palghar) जिल्हा परिषद आणि पंच्यायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (ता. ५ ऑक्टोबर) मतदान होत असून या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष ते खासदारपुत्राच्या मतदार संघाकडे. या ठिकाणी राज्यातील शिवसेनेच्या (ShivSena) मंत्र्यानी आणि खासदारांनी ठिय्या देऊन हि निवडणूक प्रतिष्टेची केली आहे. तर त्या विरोधात भाजपने स्थानिक विरोधात उपरा, असा रंग प्रचाराला दिली आहे.

पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्या मुलाला उतरवल्याने डहाणू तालुक्यातील वणई गट नकाशावर आला आहे. या गटात सहाजण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गावित आणि शिवसेना नेते, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी हि जागा प्रतिष्टेची केली आहे. ओबोसी आरक्षण रद्द झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. साऱ्याच पक्षांनी ओबीसी उमेदवार दिले असताना शिवसेनेने मात्र जिल्हापरिषद सदस्यांला घरी बसवून त्या ठिकाणी गावित यांचा मुलगा रोहित गावित यांना उमेदवारी दिल्याने हा मतदार संघ सद्या चर्चेत आहे.

या निवडणुकीच्या माध्यमातून गावित हे आपल्या मुलाला आमदारकी किंवा खासदारकीसाठी आपला वारसदार म्हणून पुढे आणत असल्याची चर्चा आहे. तर या विरोधात भाजपने रान उठवले आहे. त्यांनी निवडणुकीला स्थानिक विरोधात उपरा असा रंग दिला आहे. त्याच बरोबर शिवसेना ओबीसींना डावलत असल्याचा प्रचार केल्याने निवडणूक चांगलिच रंगली आहे. या गटात भाजपचे पंकज कोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विराज गडग, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हितेश पाटील, काँग्रेसचे वर्षा वायडा आणि बहुजन विकास आघाडीकडून सारस जाधव, तर अपक्ष म्हणून प्रितेश निकोले हे आपले नशीब अजमावत आहेत.

पालघर जिल्हा परिषदेच्या १५ जगासाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग फसला आहे. राज्याच्या सत्तेतील तीनही पक्ष एकमेका विरोधात निवडणूक लढत आहेत. यापुढील निवडणुकांमध्येही याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आनंदात आहेत. कारण उमेदवारीसाठी बाशिंग बांधलेल्या कार्यकर्त्यांनी यामुळे निश्वास सोडला आहे. पालघर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीचा रंग आला आहे. त्या धर्तीवरच या ठिकाणी सगळ्याच पक्षाचे मोठे नेते आणि मंत्री ठाण मांडून बसल्याचे दिसत आहे. उद्या मतदार राज्या कोणाच्या पारड्यात मत टाकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT