Poonam Mahajan News
Poonam Mahajan News Sarkarnama
मुंबई

Poonam Mahajan News : भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर पूनम महाजनांचं पहिलं ट्विट; 'मला एक खासदार म्हणून नव्हे तर...'

Deepak Kulkarni

Mumbai News : भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 'अबकी बार चारशे पार'चा नारा देताना 'नो रिस्क' या तत्व जवळ केल्याचं दिसून येत आहे. याच धर्तीवर भाजपने महाराष्ट्रातील एक ना दोन तर तब्बल अकरा विद्यमान खासदारांचं तिकीट कापत त्यांना थेट घरचा रस्ता दाखवला आहे. या यादीत आता पूनम महाजन यांचा देखील समावेश झाला आहे.

भाजपकडून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ विधीज्ञ उज्जवल निकम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर आता पूनम महाजन यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केली आहेत.

भाजप नेत्या आणि मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार होती. त्या 2014 पासून मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.पण यंदाच्या निवडणुकीत त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आणि शनिवारी अखेर उज्ज्वल निकम Ujjawal Nikam यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.यामुळे महाजन यांची खासदारकीच्या हॅटट्रिकची संधी हुकणार आहे.पक्षाकडून तिकीट कापले जाणे हा महाजन यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ट्विटमध्ये पूनम महाजन म्हणतात...

पूनम महाजन Poonam Mahajan यांनी भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर शनिवारी(ता.27) ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या ट्विटमध्ये म्हणतात,गेल्या दहा वर्षांपासून एक खासदार म्हणून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी देण्यात आली.त्याबद्दल भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील त्यांनी ट्विटमधून मानले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच मला एक खासदार म्हणून नव्हे तर एक मुलगी म्हणून स्नेह दिल्याबद्दल मतदारसंघातील कुटुंबा समान जनतेची मी सदैव ऋणी राहील.आणि हे नातं कायम राहील अशी आशा आहे असेही त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

माझे आदर्श, माझे वडील स्वर्गीय प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांनी मला राष्ट्र पहिलं,नंतर आपण ही शिकवण दिली आहे.आजीवन याच मार्गावर मी चालेल अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते.माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण सदैव देश सेवेसाठी समर्पित राहील, अशा शब्दांत आपल्या भावनांना पूनम महाजन यांनी वाट मोकळी करुन दिली आहे.

पूनम महाजन यांच्या उमेदवारीला मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातूनच तीव्र विरोध सुरू होता.भाजपने आपल्या जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये विद्यमान खासदार महाजन यांचा समावेश केलेला नव्हता. त्यामुळे महाजन यांचा पत्ता या निवडणुकीत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT