Shiv Sena MLA Disqualification Case Sarkarnama
मुंबई

Shivsena News: शिवसेना आमदार अपात्र प्रकरण निर्णयाविरोधातील याचिकेवरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

Shivsena MLA Disqualification: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Shivsena MLA Disqualification: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 14 मे रोजी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी उद्याची 26 एप्रिल ही तारीख निश्चित केली होती. मात्र आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. (Shivsena MLA Disqualification)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार अपात्र केले नाहीत म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने नार्वेकरांनी आमदार अपात्र प्रकरणी दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. तर या प्रकरणी शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात होणार की मुंबई उच्च न्यायालयात? हे देखील 14 मे ला स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नेमकं काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर स्वतःचा शिवसेनेचा गट अधिकृत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिवसेना (Shivsena) कोणाची यावर कायदेशीर खल सुरू झाला होता. सर्वोच्च न्यायलयात हे प्रकरण पोहोचल्यानंतर न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्र प्रकरणी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. अपात्र प्रकरणात 10 जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला. यावेळी खरी शिवसेना शिंदे गटाची असल्याचं सांगण्यात आलं होतं.

तसंच या निकालात एकनाथ शिंदे गटाचे आमदार अपात्र करण्यात आले नव्हते. त्यामुळे कायद्यानुसार शिंदेंचे आमदार अपात्र आहेत असा दावा ठाकरे गटाने करत नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर त्यांनी आक्षेप घेतला होता. शिवाय त्यांनी नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. तर तर या प्रकरणी शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात होणार की मुंबई उच्च न्यायालयात? हे पुढील सुनावणीत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT