Maharashtra political news : राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी भाजपल जोरदार झटका दिला. पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्या घरात फूट पडली असून त्यांचे ज्येष्ठ बंधू प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाणे शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र निरंजन यांनी भाजपची वाट धरली होती. त्यानंतर त्यांना आमदारकी मिळाली. आतापर्यंत त्याचे कुटुंब एकसंध होते. मात्र, बुधवारी निरंजन यांचे ज्येष्ठ बंधू प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्याने कुटुंबात फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षप्रवेशावर बोलताना ते म्हणाले, आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे. माझ्या वडिलांनी आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी दिलं. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यावरील त्यांची निष्ठा आणि पक्षाशी असलेली बांधिलकी हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे.
आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना मन भरून आलं आहे. विशेषतः खासदार पार्थ पवार यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी मला पक्षप्रवेशासाठी मोलाचं सहकार्य केलं. तसेच ठाणे जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करेन, असे प्रबोध डावखरे म्हणाले.
वसंतराव डावखरे यांनी अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निष्ठेने काम केल्याचे सांगत भुजबळ म्हणाले, आज त्यांचे सुपुत्र प्रबोध डावखरे पक्षात प्रवेश करत आहेत, ही आनंदाची बाब आहे. ते यशस्वी उद्योजक असून फिटनेस आणि जिम व्यवसाय क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम उभं केलं आहे. पक्षाकडून त्यांना योग्य सन्मान आणि संपूर्ण पाठबळ दिलं जाईल. त्यांनी निर्धास्तपणे काम करावं. आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.