CM Vijay government crisis : विजय यांचे सरकार संकटात? 10 दिवसांतच नेत्यांकडून बंडाचे निशाण, तमिळनाडूत पुन्हा उलथापालथ

TVK vs CPM, Tamil Nadu politics : विजय सरकारला सीपीएमसोबतच सीपीआय, व्हीसीके, मुस्लिम लीग या पक्षांनी बाहेरून पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेसचे पाच आमदार थेट सत्तेत सहभागी होणार आहेत.
CM Vijay government
CM Vijay governmentSarkarnama
Published on
Updated on

TVK government support crisis : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्यासमोरील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आधी सत्तास्थापनेसाठी आणि आता सरकार स्थिर ठेवण्यासाठी त्यांना धडपड करावी लागत आहेत. आता पुन्हा एकदा सरकारवर अस्थिरतेचे संकट घोंघावू लागले आहे. सत्तास्थापनेनंतर दहा दिवसांतच एका मित्रपक्षाने TVK सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी देत खळबळ उडवून दिली आहे.

सरकारमधील मित्रपक्षांकडून विजय यांच्या सरकारला पाठिंबा काढून घेण्याची धमकी देण्यात आली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उघडपणे विजय यांना कडक इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात चर्चांना उधाण आले आहे. या पक्षाचे दोन आमदार असून पक्षाने विजय सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे.

का दिली धमकी?

विजय सरकारला सीपीएमसोबतच सीपीआय, व्हीसीके, मुस्लिम लीग या पक्षांनी बाहेरून पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेसचे पाच आमदार थेट सत्तेत सहभागी होणार आहेत. बहुमत सिध्द करण्याच्या काही तास आधी एआयएडीएमकेच्या बंडखोर गटाने विजय यांना पाठिंबा जाहीर केला. त्या जोरावर विजय यांनी निर्विवादपणे बहुमत सिध्द केले. पण आता AIADMK च्या काही आमदारांचा समावेश मंत्रिमंडळात होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर सीपीएमने आक्षेप घेतला आहे.

CM Vijay government
Modi viral moment : PM मोदी अन् मेलोनी यांच्यातील 'मेलोडी' तुफान व्हायरल; खास गिफ्ट देतानाचा व्हिडिओ आला समोर...

माकपाचे राज्य सचिव पी. शन्मुगन यांनी बुधवारी सांगितले की, मुख्यमंत्री विजय यांनी एआयएडीएमकेला कॅबिनेटमध्ये स्थान दिले तर आमचा पक्ष पाठिंब्याबाबत विचार करेल. मुख्यमंत्री असा आत्मघातकी निर्णय घेणार नाहीत, असा आम्हाला विश्वास आहे. पण त्यांनी विरोधी पक्षाला सोबत घेतले तर त्यांच्यासोबत आम्ही जाणे अशक्य आहे, असा स्पष्ट इशारा शन्मुगन यांनी दिला आहे.

CM Vijay government
PM Modi Norway Visit: नॉर्वे दौऱ्यात थेट PM मोदींनाच महिला पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नांमुळं तणाव! पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयानं नेमकं काय दिलं उत्तर?

एआयएडीएमकेच्या सुमारे २५ बंडखोर आमदारांनी विजय यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मित्रपक्षांनी साथ सोडली तरी त्यांचे सरकार सध्यातरी सुरक्षित आहे. मात्र, सुरूवातीला याच मित्रपक्षांनी विजय यांना पाठिंबा देत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे पहिल्या काही दिवसांतच मित्रपक्षांना नाराज करणे त्यांना परवडणारे नाही. डावे पक्ष, काँग्रेस, मुस्लिम लीग या पक्षांचा एआयएडीएमकेला कडाडून विरोध आहे. या पक्षाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे विजय आता नेमका काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंत्री आधव अर्जून यांनी एका कुटुंबाप्रमाणे कॅबिनेट चालावी, असे मुख्यमंत्री विजय यांची अपेक्षा असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com