Thane News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला गुरुवारी (ता.29) एक महिना पूर्ण होत आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असली तरी अद्याप मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्यात यश आलेलं नाही. दुसरीकडे पूर्णेकर कुटुंबियांनी ठाण्याच्या माजी महापौर व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदेंनीच ही हत्या घडवून आणल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. याचदरम्यान,पोलिसांनी शिंदे पती पत्नीची चौकशी करण्यात आलेली आहे.आता मिनाक्षी शिंदे यांनी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
मीनाक्षी शिंदे यांनी गुरुवारी(ता.29)ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुखपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सूपुर्द केल्याची मोठी माहिती समोर येत आहे. एकीकडे ठाण्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आमने सामने आले असतानाच शिंदेंनी राजीनामा दिल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. या हत्येप्रकरणी पूर्णेकर कुटुंबाकडून गेल्या महिन्याभरापासून माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. त्यांनी सुपारी देऊन पूर्णेकरांना संपवल्याचं त्यांचं कुटुंबियांचं म्हणणं आहे.त्यांच्या शिंदे पती-पत्नीच्या अटकेची मागणी करतानाच त्यांच्या हत्येतील सहभागाचे काही पुरावेही मुलगा राम पूर्णेकरांनी समोर आणले होते.
मीनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करतानाच पत्र लिहित आपली बाजू मांडली आहे. त्यांनी या पत्रात गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर तसेच पक्षपातळीवर माझ्याबाबत सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप व सर्वपक्षीय एकत्रित येऊन माझ्यावर विविध आरोप करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच पक्ष नेतृत्वास अर्थात मुख्य नेते व पालकमंत्री म्हणून आपणास वेठीस धरण्याचे जे षडयंत्र चालू आहे हे पाहून माझ्या मनाला प्रचंड वेदना होत असल्याचं शिंदेंना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
मीनाक्षी शिंदे पत्रात म्हणतात की, मी आजवर संपूर्ण निष्ठेने पक्षाचे काम केले. पक्षाला किंवा आपणांस कधीही मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही कृत्य केले नाही. तरीही, ज्या प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही, त्यामध्ये माझे नाव जोडून आपल्यावर आणि पक्षावर दबाव निर्माण केला जात आहे, हे पाहून मन व्यथित होत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे
तसेच ज्या नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी मी आजवर काम केले, त्याच नेतृत्वाच्या बदनामीचे कारण माझ्यामुळे व्हावे, ही कल्पनाही मला सहन होत नसल्याचा उल्लेखही शिवसेनेच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. त्यांनी माझी निष्ठा आणि माझ्या कार्याची पावती आरोपांच्या माध्यमातून दिली जात असल्याची भावना मनाला बोचत असल्याचं सांगितलं आहे.
म्हणूनच, मी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा आपणाकडे सुपूर्द करीत आहे. हा निर्णय नाराजीतून नव्हे, तर आपल्या नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतला आहे. माझ्या भावनांची बाजू आपण समजून घ्याल, ही अपेक्षा.
प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात दिवसेंदिवस शिंदे पती-पत्नीच्या अडचणी वाढत चालल्याचं दिसून येत आहे. चौकशीनंतरही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दोघांंवरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. आता वातावरण निवळण्याचं नाव घेत नसल्यांमुळेच मीनाक्षी शिंदे यांनी स्वत:हून राजीनामा दिला आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेतही मंत्री प्रताप सरनाईक यांनी जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत पदावर न राहणेच योग्य राहील असे सांगत एकप्रकारे मीनाक्षी शिंदेंना इशाराही दिला होता.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. या हत्येप्रकरणी पूर्णेकर कुटुंबाकडून गेल्या महिन्याभरापासून माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. त्यांनी सुपारी देऊन पूर्णेकरांना संपवल्याचं त्यांचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. त्यांच्या शिंदे पती-पत्नीच्या अटकेची मागणी करतानाच त्यांच्या हत्येतील सहभागाचे काही पुरावेही मुलगा राम पूर्णेकरांनी समोर आणले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.