Thane News : ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकारणानंतर ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या हत्या प्रकरणानंतर कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी यावेळी पोलिसांना पुरवणी जवाब नोंदवून घेण्यास सांगितले होते. त्यानुसार आता पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे.
ठाणे गुन्हेशाखेने या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी संतोष कनोजियाला प्रयागराजमधून बेड्या ठोकल्यानंतर आता तपासाला वेग आला आहे. ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारी ठाणे क्राइम ब्रँचने राजेंद्र शिंदे यांची चौकशी केली. त्यानंतर बुधवारी परत त्यांना चौकशीसाठी बोलावून घेतले आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबाकडून सुरुवातीपासूनच ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी यावेळी पोलिसांना पुरवणी जवाब नोंदवून घेण्यास सांगितले होते. तर पूर्णेकर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी उद्धव ठाकरे ठाण्यात आले होते. त्यावेळेसपासून एकमेकावर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण तापले होते.
पूर्णेकर हत्या प्रकारणात सुरुवातीपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ही हत्या शिंदे पती-पत्नीनेच सुपारी देऊन घडवून आणल्याचा आरोप पूर्णेकर यांच्या कुटुंबियांनी केल्याचा आरोप केला आहे. त्यांचीही चौकशीची जोरदार मागणी करत मोठा मोर्चाही ठाण्यात काढण्यात आला. यानंतर तपासाने वेग घेतला होता.
ठाणे क्राइम ब्रँचने या प्रकरणी मन्गलवारी दुपारी अचानक राजेंद्र शिंदे यांना चौकशीसाठी बोलावून घेतले होते. मंगळवारी त्यांची या प्रकरणी चौकशी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा माजी महापौरांच्या पती राजेंद्र शिंदे यांना सलग दुसऱ्या दिवशी चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.