

CJP Saurav Das and Ashutosh Ranka Arrested : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके, नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना मागील आठवड्यात पोलिसांनी अटक केली होती. वर्षभर हिंसक आंदोलन करणार नाही, असा बाँड त्यांनी कोर्टात लिहून दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. पण अखेर या नेत्यांना तुरुंगात जावे लागले आहे.
दिल्ली पोलिसांनी सौरव दास आणि रांका यांच्यासह अजिंक्य शिंदे यांना मंगळवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. जंतर मंतर हे ठिकाणी आंदोलनास्थळातून वगळण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीजेपीच्या या नेत्यांनी हातात तिरंगा घेत जंतर मंतरकडे धाव घेतली होती.
पोलिसांनी या तिघांसह अन्य काही जणांना लगेच ताब्यात घेतले होते. परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना बुधवारी सकाळी स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर दास आणि रांका या दोघांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे या दोघांना पाच दिसत कोठडीत काढावे लागणार आहेत.
अजिंक्य शिंदे यांची बाँड लिहून घेत सुटका करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना पुढील सहा महिने आंदोलन करता येणार नाही. त्यामुळे आता दिपके यांच्यासह दास, रांका आणि शिंदे या सीजेपीच्या चारही नेत्यांना पोलिसांनी कायद्याच्या कचाट्यात घेरलं आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
राहुल गांधींचा संताप
दरम्यान, दास आणि रांका यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनादरम्यान तिरंगा फडकविणे हा गुन्हा नाही. त्यासाठी तरुणांना तुरुंगात डांबणे हा भ्याडपणा आहे.
विद्यार्थी, तरुण, पत्रकार आणि INDIA आघाडी यांचे झेंडे वेगळे असले तरी लढा एकच आहे. नागरिकांच्या संविधानिक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठीच हा लढा आहे. जंतर मंतर हे ठिकाणी देशातील जनतेचे असून ते पुन्हा जनतेला मिळवून देऊ, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. दीपके यांनीही संताप व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.