Purnekar Murder Case: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर हा आपल्या वडिलांच्या हत्या प्रकरणातील महत्वाचे पुरावे आणि कागदपत्रं पोलिसांना देण्यासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाला आहे. याठिकाणी खंडणीविरोधी पथकाकडं त्यांनी हे पुरावे सुपूर्द केले आहेत. पूर्णेकरांच्या हत्येनंतर चौथ्या दिवशी ही महत्वाची माहिती समोर येत आहे. या पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर हा कट नेमका कोणी रचला याचा खुलासा होऊ शकतो.
प्रदीप पूर्णेकर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील विभाग प्रमुख होते. २९ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या मानपाडा (मनोरमानगर) इथल्या कार्यालयाजवळच गोळ्या घालून तसंच धारदार शस्त्रानं वार करत हत्या केली. या प्रकारामुळं ठाण्यात एकच खळबळ उडाली. याप्रकारानंतर पूर्णेकरांच्या कुटुंबियांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनीच ही हत्या घडवून आणल्याचा आरोप केला होता. कारण यापूर्वी त्यांच्यामध्ये महापालिका निवडणूक आणि इतर कारणांमुळं वाद झाले होते. पण शिंदे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
वडिलांच्या हत्येपूर्वी चार दिवसांपासूनच त्यांना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती, तसंच यासाठी त्यांची रेकी देखील करण्यात आली होती, असा दावा पूर्णेकरांच्या मुलानं केला अनेकदा पोलिसांसमोर केला आहे.
दरम्यान, या संवेदनशील प्रकरणी पोलिसांनी विशेष तपास पथकाद्वारे तपास सुरु केला आहे. यानंतर प्रमुख संशयित आरोपी प्रकाश उर्फ पप्या शिंदे याच्यासह अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच मीरारोड आणि इतर ठिकाणांहून काही महिलांची देखील कसून चौकशी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.