MLC Election 2026: जागा वाटपावर आजच्या बैठकीत तोडगा काढा अन्यथा.... ; संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा

MLC Election 2026: राज्यात सध्या शिक्षक-पदवीधर विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीची लगबग सुरु आहे. पण महाविकास आघाडीकडून अद्याप जागा वाटपावर तोडगा निघालेल नाही.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on: 
Updated on: 

MLC Election 2026: राज्यात सध्या शिक्षक-पदवीधर विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीची लगबग सुरु आहे. पाच मतदारसंघांसाठी ही निवडणूक जाहीर झाली आहे, यात महायुतीतील घटकपक्ष एकत्रित निवडणूक लढवत आहेत. पण दुसरीकडं महाविकास आघाडीचं मात्र जागा वाटपाबाबत अद्यापही एकमत होताना दिसत नाहीए. आज या संदर्भात मविआची महत्वाची बैठक पार पडणार आहे. पण या बैठकीतही जर जागा वाटपावर सकारात्मक तोडगा निघाला नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळाची तयारीही सुरु केली आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत सूचक माहिती दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, "महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका एकत्र लढाव्यात अशी जरी आमची भूमिका असली तरी आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांची गणितं वेगळी आहेत. प्रत्येकला वाटतंय की आम्ही फार मोठी मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळं जर एकमत होत नसेल तर मैत्रीपूर्ण लढती होऊ द्या काही हरकत नाही ना?" याचाच अर्थ असा की, आजच्या बैठकीत जागा वाटपावर एकमत न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत होईल, असे संकेतच संजय राऊत यांनी दिले आहेत. म्हणजेच काँग्रेसनं जाहीर केलेल्या तीन जागांवरही ठाकरेंची शिवसेना आपले उमेदवार उभे करु शकते. यामुळं काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.

Sanjay Raut
MLC Election : मंत्री हसन मुश्रीफांचा सेनापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर? पुणे पदवीधरमधून उमेदवारीची चर्चा

काँग्रेसनं काल रात्री उशीरा तीन जागांवर उमेदवार जाहीर केले. यामध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी, पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगांवकर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून प्रा. आदिती पोहरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळेत मतदान पार पडणार आहे. तर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Sanjay Raut
MLC election : विधान परिषद निवडणूक: पाचही मतदारसंघात बंडखोरांची हवा; महायुती, महाविकास आघाडीत बिघाडी

दरम्यान, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), पुणे, नागपूर विभाग या पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे विभाग या दोन शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक जाहीर झाली आहे. या जागांवरील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपणार आहे. कार्यकाळ संपत असलेल्या आमदारांमध्ये सतीश चव्हाण (औरंगाबाद पदवीधर), अरुण लाड (पुणे पदवीधर), अभिजीत वंजारी (नागपूर पदवीधर), किरण सरनाईक (अमरावती शिक्षक) आणि जयंत आसगावकर (पुणे शिक्षक) यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com