Pradeep Purnekar .jpg Sarkarnama
मुंबई

Thane Crime: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: सर्वात मोठा पुरावा समोर, सातवेळा चौकशी, आता थेट मारेकऱ्यांसोबतचा Video, राजेंद्र शिंदेंचा पाय आणखी खोलात

Pradeep Purnekar and Rajendra Shinde: ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या निर्घृण हत्येप्रकरणी दिवसागणिक नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यात ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाच्या हाती केलेल्या अटक आरोपींच्या कसून चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे समोर आलेले आहेत.

Deepak Kulkarni

Thane News: ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या निर्घृण हत्येप्रकरणी रोज दिवसागणिक नवनवीन धक्कादायक खुलासे केले जात आहे. यात ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाच्या हाती केलेल्या अटक आरोपींच्या कसून चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे समोर आलेले आहेत. तसेच राम पूर्णेकर यांनी त्यांच्या वडिलांच्या हत्येप्रकरणातला सर्वात मोठा आणि तितकाच धक्कादायक पुरावा समोर आणला आहे.

राम पूर्णेकर यांनी सोमवारी(ता.26 ऑक्टोबर) ठाण्यात महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे आणि पूर्णेकरांच्या हत्येप्रकरणातील मारेकऱ्यांचा एक व्हिडीओ दाखवला आहे. या नव्या पुराव्यामुळे राजेंद्र शिंदेंचा पाय आणखी खोलात गेला आहे.

या नव्या व्हिडीओत राजेंद्र शिंदे हे पूर्णेकरांच्या हत्येत सहभागी असणाऱ्या पप्या शिंदे, नितेश पवार, संतोष कनोजिया (टल्ली), अमित सिंग (पपलू) यांच्यासोबत दिसत आहेत.महत्त्वाची बाब म्हणजे प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदेंची आतापर्यंत सातवेळा चौकशी करण्यात आली आहे.

राम पूर्णेकर पत्रकार परिषदेत म्हणाले, आज पप्पांना जाऊन 26 दिवस झाले.पण आम्हाला अजूनही न्याय मिळालेला नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त कॉल करुन आश्वासन दिले.पण अजूनही मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे या दोघांना अटक करण्यात आलेली नाही. यावेळी राम पूर्णेकर यांनी एका पोलिस अधिकाऱ्याचे आभार मानले आहेत.

संबंधित पोलिसाने आपल्याला हेल्मेट घालून आलेला व्यक्ती राजा शिंदेचा व्हिडिओ पाठवला आहे. समोर आलेल्या या व्हिडीओत प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी नितेश पवार,राजा शिंदे,टल्ली,पप्प्या शिंदे असे सर्वजण एकत्र दिसून येत आहे. यापूर्वी तब्बल सातवेळा पोलिसांनी तासन् तास आणि मारेकऱ्यांसमोरासमोर बसवूनही चौकशी झाली होती. चौकशी केल्यानंतर या व्हिडीओमुळे राजेंद्र शिंदे यांच्याभोवतीचं संशयाचा धुकं दाट होण्याची शक्यता आहे.

ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगरमधील त्यांच्या कार्यालयात गोळ्या झाडून व धारदार शस्त्रानं वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात पूर्णेकर कुटुंबाने ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT